Illegal stock of liquor seized at Chandori Chauphuli after intercepting the truck. Neighboring State Excise Department team. esakal
नाशिक

Nashik Crime: ट्रकमधून अवैध मद्याची तस्करी; औरंगाबाद रोडवर रंगला पाठलागाचा थरार

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : गोव्यात निर्मिती व विक्रीसाठी असलेला मद्यसाठा अवैधरीत्या महाराष्ट्रात विक्रीसाठी ट्रकमधून आणला जात असताना, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने थरारक पाठलाग करून जप्त केला.

ट्रक व विदेशी मद्यसाठा,असा सुमारे ५२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. (Illegal Liquor Smuggling in Trucks thrill of the Rangla chase on Aurangabad Road Nashik Crime)

श्यामू रज्जू गौड (वय ३७, रा. एकवीरानगर, कांजूरमार्ग, मुंबई), मोहम्मद सुलतान अस्लम अन्सारी (२६, रा. उळवे, ता. पनवेल, जि. रायगड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या येवला पथकाला आयशर ट्रकमधून अवैधरीत्या मद्याची वाहतूक होत असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार पथकाकडून येवला येथील विंचूर चौफुलीवर शोध घेतला जात असतानाच, संशयित ट्रक निदर्शनास आला.

परंतु संशयितांना पथकाची चाहुल लागताच त्यांनी ट्रक चांदोरीच्या दिशेने वेगात पळविला. पथकाने पाठलाग सुरू करीत, ट्रक चांदोरी चौफुली येथे अडविला. संशयितांकडे चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ट्रकची (एमएच ०४, केयू ३७२४) कसून तपासणी केली असता, त्यात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विदेशी मद्यसाठा आढळून आला. संबंधित साठा कागदी खोक्यांच्या मागे दडविण्यात आलेला होता. पथकाने ट्रकसह मद्यसाठा असा ५२ लाख ४३ हजार ५८६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

संबंधित कामगिरी उपायुक्त डॉ. वा. ह. तडवी, अधीक्षक शशिकांत गर्जे, उपअधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली येवला विभागाचे निरीक्षक विठ्ठल चौरे, दुय्यम निरीक्षक संजय वाकचौरे, प्रवीण मंडलिक, अवधूत पाटील, विठ्ठल हाके, अमन तडवी, संतोष मुंडे, मुकेश निंबेकर यांनी बजावली. निरीक्षक चौरे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT