shop owner waiting for customers esakal
नाशिक

Nashik: वातावरणामुळे मंदावले रसवंतीगृहातील घुंगरांचे आवाज! अवकाळीच्या शक्यतेने हंगामी व्यवसायांवर परिणाम

सकाळ वृत्तसेवा

Nashik : उन्हाळा संपण्यास जेमतेम महिना बाकी आहे. मात्र मार्च व एप्रिल या उन्हाळ्यातील दोन महिन्यात महिन्यापासून अधून मधून बरसत असलेला अवकाळी पाऊस, वादळी वारा, गारपीट, यामुळे यावर्षी म्हणावे तसे ऊन पडले नाही.

वातावरणातील बदलामुळे ऐन उन्हाळ्यात पुरेसे ऊन पडत नसल्याने रसवंती गृहांवरील घुंगरांचे आवाज मंदावले आहे. मध्यंतरीचे दोन-तीन दिवस वगळता रसवंतीगृह चालकांना ग्राहकांची प्रतिक्षाच करावी लागत आहे.

रसवंती गृहांबरोबरच इतर हंगामी व्यवसायांवरही मोठा परिणाम झाला आहे. (Impact on sugarcane juice seasonal businesses due to possibility of unseasonal rain weather Nashik news)

शहरासह कसमादे परिसरात फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात रसवंतीगृह सुरु झाली. गेल्या वर्षी १५ जूनपर्यंत रसवंतीगृह सुरु होती. यावर्षी देखील कडक उन्हात रसवंतीगृहांच्या घुंगरांचा आवाज निनादेल अशी अपेक्षा होती.

महामार्गासह शहराला जोडणाऱ्या चारही बाजूंच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी तसेच शहरात चौक व मोक्याच्या ठिकाणी रसवंतीगृहे थाटण्यात आली आहेत. उन्हाळा सुरु होऊन तीन महिने उलटले तरी देखील या व्यवसायात अजून जम बसलेला नाही.

फेब्रुवारी थंडीत गेल्याने व्यवसाय जेमतेम होता. मार्च-एप्रिलमध्ये ऊन-सावली, बेमोसमी पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे वातावरण सामान्य राहिले.

मालेगाव व परिसरातील तापमान मार्चच्या सुरवातीलाच चाळीशी ओलांडत असते. येथे मार्च ते जुनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तापमान ४० ते ४५ अंश दरम्यान राहते. यावर्षी एप्रिलचा शेवटचा आठवडा वगळल्यास पारा ३५ ते ४० अंशाच्या दरम्यान राहिला आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

कडक ऊन पडत नसल्याने शेकडो रसवंतीगृह चालकांना ग्राहकांची प्रतिक्षा करावी लागते. रसवंतीगृह बरोबर शीतपेय, आइस्क्रीम, बर्फगोळे, कुल्फी, लस्सी आदींच्या विक्रीतही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

यातच राज्यात पुढील पाच ते सहा दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे हजारो व्यावसायिकांना मे महिन्यात कडक ऊन पडून व्यवसाय बहरेल अशी अपेक्षा आहे.

लग्नसराईचा फटका

रसवंतीगृह व इतर हंगामी व्यवसायाला बंद असलेल्या लग्नसराईचा फटका बसला आहे. २० मार्च ते १ मे पर्यंत अस्त असल्याने विवाहसोहळे बंद आहेत. सध्या अत्यल्प प्रमाणात विवाहसोहळे होत आहेत. मोठ्या प्रमाणातील विवाहसोहळे बंद असल्याने दळणवळण कमी झाले आहे.

या कारणांनी देखील व्यवसाय मंदावला आहे. २ मेपासून लग्नसोहळ्यांची धूम सुरु होणार आहे. मे महिन्यातील ऊन व लग्नसोहळा व्यावसायिकांना दिलासा देतील का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT