Nashik News: 
नाशिक

Nashik News: CM शिंदेंच्या स्वीय सहाय्यकाच्या नावे तोतयेगिरी, नाशिक जिल्हा बँकेत फोन! नेमकं काय घडलं?

भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञातविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. ज्या नंबरवरुन फोन आला त्या नंबरचा पोलीस तपास करत आहेत.

Sandip Kapde

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वीय सहाय्यकाच्या नावे तोतयेगिरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्र्याचा पीए बोलत असल्याचा फोन नाशिक जिल्हा बँकेत करण्यात आला आहे. या घटनेमुळे बँक प्रशासनात खळबळ माजली होती. मात्र चौकशी केल्यानंतर संपूर्ण प्रकार समोर आला.

सक्तेच्या रजेवर असलेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा कामावर घ्या, अशी मागणी फोन करणाऱ्याने केली. बँक प्रशासनाने मुख्यमंत्री कार्यालयाकडे याची चौकशी करताच हा प्रकार उघड झाला आहे. भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञातविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. ज्या नंबरवरुन फोन आला त्या नंबरचा पोलीस तपास करत आहेत. सक्तेच्या रजेवर असलेल्या बँक अधिकाऱ्याची अंतर्गत चौकशी सुरु आहे. त्यांना रजेवर घेण्याची अज्ञात इसमाने फोनवर सूचना केली. (Nashik News)

नेमकं काय घडलं?

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांना मी मुख्यमंत्री साहेबांचा पीए कानडे बोलतोय... शैलेश पिंगळे यांना कामावर हजर करून घ्या. फोन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या तोतया पीए विरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस संशयीताचा शोध घेत आहे. लवकरच संशयीतास बेड्या ठोकणार असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमध्ये १८ जून २०१८ ते १० ऑगस्ट २०२० दरम्यान झालेल्या एका व्यवहाराबाबत सोशल मीडिया तसेच वृत्तपत्रांमध्ये वृत्तप्रसारित झाले होते. वरिष्ठाच्या आदेशानुसार याबाबत चौकशी सुरू आहे. यासंदर्भात बँकेचे कार्यकारी संचालक शैलेश पिंगळे आणि अन्य काही जणांविरुद्ध कारवाई करत पिंगळे यांना मे २०२३ मध्ये सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. अद्याप प्रकरणाची चौकशी सुरू आहे. चौकशी अंतिम टप्प्यात आली असता २८ नोव्हेंबर २३ बँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांना सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास त्यांच्या मोबाईल क्रमांकावर अज्ञात व्यक्तीचा फोन आला.

मी मुख्यमंत्री महोदयांचा पीए कानडे बोलत आहे, आपल्याकडे चौकशी सुरू असलेल्या शैलेश पिंगळे यांना जनरल मॅनेजर म्हणून हजर करून घ्यावे. असा मुख्यमंत्री साहेबांचा निरोप आहे. असे सांगितले तसेच चव्हाण यांचा नातू मल्हार यांच्या तब्येतीची विचारपूस करत त्यास त्यांच्या ओळखीच्या डॉक्टरकडे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयात याबाबत चौकशी केली. कानडे नावाचा कोणीही व्यक्ती नसल्याची माहिती मिळाली.

२९ नोव्हेंबर २०२३ सकाळी आठ वाजेच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचा पीए म्हणून फोन आलेल्या मोबाईल क्रमांकावर चव्हाण यांनी फोन केला. तो फोन उचलला गेला नाही. सकाळी ११ वाजेच्या सुमारास सात मिस कॉल असल्याने चव्हाण यांना आलेला फोन त्यांनी उचलला. पुन्हा संशयिताने मी मुख्यमंत्री साहेबांचा पीए कानडे बोलत आहे. ५ डिसेंबर २०२३ मुख्यमंत्री साहेबांनी तुम्हाला भेटायला बोलावले. असे सांगून त्याने फोन बंद केला.

५ डिसेंबरला मुख्यमंत्री कार्यालयाकडून कुठल्याही प्रकारे अधिकृत सूचना आली नाही. तसेच १५ ते १८ डिसेंबर दरम्यान हिवाळी अधिवेशना निमित्ताने ते नागपूर येथे होते. तेथेही त्यांनी चौकशी केली असता कानडे नावाचा कुठलाही व्यक्ती मुख्यमंत्री कार्यालयात नसल्याची माहिती समोर आली. अज्ञात तोताया व्यक्तीने फोन फोन केला असल्याची खात्री झाली. त्यांनी याबाबत ५ डिसेंबरला भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. त्यानुसार गुरुवार (ता.२८) अर्जाच्या चौकशीअंती चव्हाण यांच्या तक्रारीवरून ९६८९****** मोबाईल क्रमांक धारक तोताया पीए विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT