marathi sahitya sammelan esakal
नाशिक

संमेलनाच्या सर्व सूचना अमलात आणा - समन्वयक समीर भुजबळ

यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सोशल मीडियाद्वारे जागतिक पातळीवर जाणार आहे. त्यामुळे नाशिककरांसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे.

तुषार महाले

नाशिक : यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (marathi sahitya sammelan) सोशल मीडियाद्वारे (Social media) जागतिक पातळीवर जाणार आहे. त्यामुळे नाशिककरांसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. भुजबळ नॉलेज सिटीचा परिसर सुसज्ज असल्यामुळे कमी वेळात संमेलन यशस्वी करण्यासाठी मदत होईल. त्यामुळे संमेलनाबाबतच्या सर्व संकल्पना, सूचना अमलात आणा, असे आवाहन समन्वयक समीर भुजबळ यांनी केले.

संमेलन स्थळ कविवर्य कुसमाग्रजनगरी, भुजबळ नॉलेज सिटी येथे रविवारी (ता. ३१) ४० समित्यांचे प्रमुख व उपप्रमुखांची बैठक झाली. त्या वेळी श्री. भुजबळ बोलत होते. ते म्हणाले, की ‘मेट’मधील कर्मचारी, विद्यार्थ्यांना उत्सव व्यवस्थापन करण्याची सवय आहे. त्याचा संमेलनाला लाभ होईल.

संमेलनात कुठे काय आहे साहित्य रसिकांना याबाबत माहिती हवी यासाठी भुजबळ नॉलेज सिटीने तयार केलेला संमेलनस्थळाचा नकाशा.

नकाशा प्रसिद्ध

या बैठकीनंतर सर्व समिती प्रमुखांनी संमेलनस्थळाची पाहणी केली. आयडिया कॉलेजचे दिनेश जातेगावकर यांनी कॅम्पसमधील कुठे काय होणार आहे, याविषयी पॉवर पॉइंटद्वारे सादरीकरण केले. कॅम्पस्‌मधील वीसहून अधिक जागांची माहिती देण्यात आली. संमेलनातील मुख्य समारंभ, कविकट्टा, चर्चासत्र, पुस्तक प्रकाशन, संमेलन ध्वज, बालकट्टा, अतिमहत्त्वाच्या अतिथींसाठी व्यवस्था, ग्रंथप्रदर्शन, जेवण व्यवस्था, मीडिया हाउस, गझल गायन, अभिजात मराठी, पार्किंग आदी स्थळांचा नकाशा समितीप्रमुखांना दाखविण्यात आला. यात सूचनेनुसार बदल होतील, असे संयोजकांनी सांगितले. तसेच, संमेलनात तीन दिवस विविध उपक्रम कोणत्या ठिकाणी आहेत, याविषयीची माहिती रसिकांना व्हिडिओद्वारे (वॉक थ्रू) उपलब्ध होणार आहे. शॉर्ट फिल्म, एकपात्री प्रयोग, आर्ट आदी कार्यक्रम ठेवल्यास नाशिकमधील कलाकारांचे कलागुण दिसतील, अशी सूचना श्री. भुजबळ यांनी मांडली.

दिपक चांदेंनी संमेलनासाठी दिलेला धनादेश स्विकारताना स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्यासह पदाधिकारी.

दीपक चांदेंकडून २५ लाखांची मदत

बांधकाम व्यावसायिक दीपक चांदे यांनी साहित्य परंपरेत आपलेही योगदान असावे, यासाठी २५ लाखांची मदत संमेलनाला देऊ केली आहे. साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याकडे त्यांनी पाच लाखांचा धनादेश सुपूर्द केला. या वेळी निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, निधी संकलन समितीप्रमुख रामेश्‍वर कंलत्री, सदस्य नंदकुमार सूर्यवंशी, सुभाष पाटील, प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर आदी उपस्थित होते. त्यांनी २ व ४ डिसेंबरला होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा, शहरात उभारण्यात येणाऱ्या कमानींचा आर्थिक भार उचलला असून, त्यांच्या हॉटेलमधील दहा रूम पाहुण्यांसाठी विनामूल्य देण्यात येणार आहेत.

प्रा. मिलिंद जोशी यांनीही काही सूचना केल्या. एमईटी संमेलन समन्वयक शेफाली भुजबळ, निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, सर्व समित्यांचे मुख्य समन्वयक विश्‍वास ठाकूर, सहकार्याध्यक्ष मुंकुंद कुलकर्णी, कार्यालयीन प्रमुख दिलीप साळवेकर, कार्यवाह प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर, सुभाष पाटील, भगवान हिरे, वसंत खैरनार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे शिवाजी कर्डिले १४९८४ मतांनी आघाडीवर.

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT