one village one ganesha esakal
नाशिक

Nashik Water Crisis: ‘एक गाव एक गणपती’ मोहीम सर्वत्र राबवा; गावागावातून ग्रामस्थांचीही मागणी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Water Crisis : बागलाण तालुक्यात गेल्या अडीच तीन महिन्यांपासून पावसाने ओढ दिल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊन शेतकरी संकटात सापडला आहे.

या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात ‘एक गाव एक गणपती’ साजरा उपक्रमाला सर्वांनी प्राधान्य द्यावे अशी सामान्य जनतेची मागणी आहे.

याबाबत प्रशासनाने सकारात्मक विचार करावा अशी मागणी बागलाणच्या माजी आमदार व राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण यांनी उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे यांच्याकडे केली आहे. (Implement One Village One Ganapati campaign everywhere Villagers also demand from villages Nashik News)

श्रीमती चव्हाण यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांसह तहसीलदार व सटाणा पोलिस ठाण्यास याबाबत पत्र पाठविले आहे. त्यानुसार बागलाण तालुक्‍यात आज दुष्काळी स्थिती आहे. ऐन श्रावणात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

काही प्रकल्प अद्यापही कोरडे असून, पाऊस येण्याची चिन्हे दिसत नाहीत. पावसाच्या दिवसांत तीन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी म्हणजे, २१ दिवसांपेक्षा जास्त दिवसांचा खंड पडला आहे.

त्यामुळे कशीबशी उगवलेली पिके करपू लागली असून, संपूर्ण खरीप हंगामच धोक्यात आल्याचे चित्र आहे. हवामान खात्याने सप्टेंबर महिन्यातही पुरेसा पाऊस होणार नाही, असा अंदाज वर्तविल्याने संपूर्ण राज्यात भीषण स्थिती निर्माण झाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तालुक्‍यात सातत्याने नैसर्गिक संकटांची मालिका सुरु आहे. अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. भाजीपाला असो किंवा कांदा - मका- बाजरी- डाळिंब- द्राक्षे असो या पिकांना योग्य भाव न मिळाल्यामुळे आर्थिक घडी विस्कटली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्याची भावना आहेच. इतर लहान मोठे व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्येही निराशा आहे. अशा स्थितीमध्ये यंदाचा गणेशोत्सव साजरा होणार आहे. शासनाने लवकरात लवकर बागलाण तालुका दुष्काळी जाहीर करावा अशी मागणी तालुक्यातून होत आहे.

दुष्काळी परिस्थितीत सटाणा- नामपूरसह सर्वच गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात यावी अशी मागणी अनेक गावातून होत आहे. प्रशासनाने त्याबाबत जनजागृती करावी या संकल्पनेस चालना द्यावी अशी मागणीही सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.

"एक गाव एक गणपतीची संकल्पना बारा वर्षांपूर्वी यशस्वीरीत्या राबविण्यात आली होती. त्यासाठी तत्कालीन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद होते. त्यामुळे तालुक्यात ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबविली जावी." - दीपिका चव्हाण, माजी आमदार, बागलाण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT