Implementation of QR code by 1200 Gram Panchayats nashik news sakal
नाशिक

Nashik News : क्यूआर कोडची साडेबाराशे ग्रामपंचायतींकडून कार्यवाही; 16 ऑगस्टला झाली लाखोंची वसुली

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीना ऑनलाइन कर भरण्यासाठी १५ ऑगस्टपासून क्यूआर कोड सक्तीचा करीत त्याच्या अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले होते (Implementation of QR code by 1200 Gram Panchayats nashik news)

‘मेरी मिट्टी- मेरा देश’ या उपक्रमांतर्गत १६ ऑगस्टला क्यूआर कोड प्रणाली राबविण्याचे आदेश होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला असून, जिल्ह्यातील एक हजार ३८८ पैकी तब्बल एक हजार २५० ग्रामपंचायतींनी त्यांची अंमलबजावणी केली आहे.

ग्रामस्थांना घरबसल्या घरपट्टी व पाणीपट्टी यांसारखे विविध कर भरता यावेत, यासाठी ग्रामपंचायतींना क्यूआर कोड सक्तीचा करण्याबाबत केंद्र सरकारच्या पंचायतराज मंत्रालयातर्फे आदेश काढण्यात आले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ग्रामपंचायत विभागाने सर्व गटविकास अधिकाऱ्यांना तसे पत्र काढत कार्यवाहीच्या सूचना केल्या. त्यानुसार १६ ऑगस्टला ही मोहीम राबविण्यात आली. तिचा अहवाल ग्रामपंचायत विभागाला नुकताच प्राप्त झाला.

तालुकानिहाय झालेली करवसुली

बागलाण (१ लाख ९९ हजार ४६२), सिन्नर (९२ हजार १७०), त्र्यंबकेश्वर (८० हजार २०१), दिंडोरी (३ लाख ९२ हजार ७२५), सुरगाणा (१८ हजार ३७९), नाशिक (२ लाख ३६ हजार ७८२), येवला (५६ हजार ७७०), चांदवड (१ लाख ६५ हजार ९५), निफाड (१ लाख ३९ हजार १५२), पेठ (८३ हजार ६८०), इगतपुरी (२ लाख ४८२). कळवण, मालेगाव, देवळा, नांदगाव तालुक्यांची माहिती उपलब्ध झाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आशिष शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT