Three sacks of municipal papers found in Bunkar Bazar and Ramdas Borse, Bharat Patil, President of Public Civic Facilities Committee, while showing the files to the municipal officials 
नाशिक

Nashik News: महापालिकेचे 3 गोणी कागदपत्र बुनकर बाजारात; मालेगावमध्ये उडाली खळबळ

महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. महापालिकेतून कागदपत्रे व फायली गायब होण्याचे अनेक प्रकार यापूर्वी घडले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News: : येथील बुनकर बाजारात महापालिकेच्या महत्त्वाच्या फाइल्स व कागदपत्रे आढळल्याने खळबळ उडाली आहे. महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार त्यातून चव्हाट्यावर आला. महापालिकेतून कागदपत्रे व फायली गायब होण्याचे अनेक प्रकार यापूर्वी घडले आहेत.

मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे बुनकर बाजारात आढळल्याने अनेक संशय व्यक्त केले जात आहेत. महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, कागदपत्रांचा पंचनामा करण्यात आला असून या प्रकरणी सखोल चौकशी केली जाईल, दोषींवर कारवाई केली जाईल, असे महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांनी सांगितले. (important files and documents of Municipal Corporation were found in Bunkar Bazar malegaon nashik news)

बुनकर बाजारातील मोकळ्या जागेत महापालिकेतील महत्त्वाच्या फायली व कागदपत्रे असलेल्या तीन गोण्या आढळून आल्या. एक तरुण तीनशे रुपयांना सदर गोण्या रद्दी म्हणून विक्री करत असल्याचे समजले. सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे, भरत पाटील आदींनी बुनकर बाजारात धाव घेऊन कागदपत्रांची पाहणी केली. महापालिकेची कागदपत्रे असल्याने त्यांनी यासंबंधी आयुक्तांना माहिती कळविली.

काही वेळेनंतर महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी इथे आले. श्री. बोरसे यांनी पोलिसांना माहिती कळविली. पोलिस व महापालिका अधिकाऱ्यांनी पंचनामा करून कागदपत्रांच्या तीनही गोण्या एका वाहनातून महापालिकेत नेल्या.

सध्या अनेक प्रकरणांची चौकशी केली जात आहे. चौकशी संबंधीच्या फायली आहेत काय? अशी शंका व्यक्त केली जात आहे. महापालिकेतून कागदपत्रे व फायली गायब होणे हे नित्याचे झाले आहे. यापूर्वी फायली गहाळ झाल्या आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे तेही बुनकर बाजारात सापडण्याचा हा पहिला प्रकार आहे.

श्री. बोरसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. श्री. पाटील, राम गवळी, कैलास शर्मा आदी उपस्थित होते. श्री. बोरसे म्हणाले, की सर्व गोण्यांमध्ये महापालिकेचा सही-शिक्का असलेल्या मूळ कागदपत्रांच्या फायली सापडल्या आहेत.

आम्ही येण्यापूर्वी एक गोणी गायब झाली असून तीन गोण्या मिळाल्या आहेत. कोणीतरी रात्री या गोण्या बुनकर बाजारात आणून टाकल्याचे सांगितले. गोण्या त्या ठिकाणी कशा आल्या? याची चौकशी करावी. बुनकर बाजारात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यातून सखोल चौकशी होऊन सत्य बाहेर येईल. ‘रेकार्ड रूम’चे कुलूप तोडून फायली गायब करण्यात आल्या का? याबाबत चौकशी व्हावी.

लाखो रुपये खर्च करून सुरक्षा रक्षक नेमले आहेत. असे असताना फायली कशा गायब होतात? भोंगळ कारभारामुळे महापालिकेची प्रतिमा दिवसेंदिवस मलिन होत आहे. नागरिकांना माहितीसाठी महत्त्वाचे कागदपत्रे मिळत नाहीत. उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. या प्रकरणाची तीन दिवसात सखोल चौकशी करावी. अन्यथा महापालिकेविरुद्ध आंदोलन छेडण्यात येईल. इशारा त्यांनी दिला.

''बुनकर बाजारात कागदपत्रांच्या गोण्यांची माहिती मिळताच, अधिकारी व कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. मागील काळात झोपडपट्टीधारकांना ‘फोटोपास’ देण्यात आले होते. ‘फोटोपास’ देताना अपात्र व्यक्तींच्या कागदपत्रांमध्ये अपूर्णता होती. अशी अपात्र कागदपत्रे सापडली आहेत. सदर कागदपत्रे गोण्यांमध्ये टाऊन हॉलमध्ये ठेवली होती. अज्ञात व्यक्तीने कागदपत्रांच्या गोण्या नेल्या असाव्यात. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. दोषींवर कारवाईची शिफारस करण्यात येईल.'' - रवींद्र जाधव, आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT