Electricity News esakal
नाशिक

Nashik MSEDCL News : चोरट्यांचा महावितरणलाच झटका; 2 रोहित्र चोरीला

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : निफाड तालुक्यातील पूर्वभागातील देवगाव, रुई येथील विद्युत रोहित्र चोरीनंतर खेडलेझुंगे येथे एक महिन्याच्या आतच दोन विद्युत रोहित्र चोरीला जाण्याच्या घटना घडल्या आहेत.

देवगाव उपकेंद्र परिसरात गत सहा महिन्यात साधारणतः सहा रोहित्रांची झाली आहे.

शनिवारी (ता. १०) मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी खेडलेझुंगे-कोळगाव रस्त्याला लागून असलेल्या शेतकरी जनार्दन घोटेकर यांच्या मालकीच्या गटनंबर ५७२ मधील रोहित्र चोरले. त्यातील धातू, ऑइल चोरून नेले. (In Khedle Zunge thieves hit biggest distribution Two Rohit stolen In six months Case increased Nashik News)

सकाळी तेथील शेतकऱ्यांनी याबाबतची माहिती वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी यांना दिली. यासंदर्भात महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता राहुल काकड, वीज तंत्रज्ञ संतोष चौरे, विद्युत कर्मचारी चेतन मेमाणे, संजय घोटेकर यांनी लासलगाव पोलिसांत तक्रार दाखल केली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली औदुंबर मुरडनर हे करत आहेत.

जिवाशी खेळ करत धाडसी चोरी

थ्री फेज वीजपुरवठा सुरु असताना रोहित्राची चोरी करणे म्हणजे मृत्यूशी खेळ करण्यासारखे आहे. परंतु चोरटे हे काम अतिशय खुबीने करत आहेत. यामुळे हे चोरटे निश्चितच विद्युत कामासंदर्भात प्रशिक्षित असावेत.

रोहित्र चोरी केल्यानंतर तांबेची तार, इन्सुलेटीव्ह ऑइल चोरीस जात आहे. रोहित्रात ५० हजार मूल्याच्या तांब्याच्या कॉईल असतात तर क्षमतेनुसार १९० ते २०० लिटर पर्यंत ऑइल असते. एका डिपीमधील ऑइल आणि धातू ची किंमत अंदाजे तीन लाखापर्यंत असते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शेतकऱ्यांची अडचणीत वाढ

विद्युत डीपी नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांना पाणी कसे द्यावे असा प्रश्न त्यांना पडला आहे. सध्या शेतीमध्ये ऊस, डाळिंब, द्राक्षे यासारखी नगदी पिके आहेत. दिवस उन्हाळ्याचे असल्याने पिकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पुरवण्याची गरज असते.

डाळिंब फळ पोषण होण्याच्या स्थितीत असल्याने पाण्याचा ताण सहन करू शकत नाही. पाण्याची कमतरता जाणवल्यास फळ गळ होऊन शेतकऱ्याचे वर्षाचे पीक वाया जाण्याची शक्यता असून मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महावितरण कंपनीने तत्काळ रोहित्र बसवून सहकार्य करावे असे आवाहन सरपंच माया सदाफळ, योगेश साबळे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta fadnavis on CM Post: महायुतीचा मोठा विजय, राजकीय चर्चेला उधाण! मुख्यमंत्री पदाबाबत अमृता फडणवीस म्हणाल्या...

Chandgad Assembly Election 2024 Results : चंदगडला भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील ठरले जायंट किलर; मिळवला मोठ्या मताधिक्याने विजय

Devendra Fadnavis: कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्रीपद कुठल्याही निकषांवर नाही!

BJP Candidate Ravisheth Patil Won Pen Assembly Election : प्रसाद भोईर यांना पराभूत करत भाजपच्या रवीशेठ पाटीलांचा दणदणीत विजय

Sneha Dubey Vasai Assembly Election 2024 Result: वसई मतदारसंघात भाजपचा झेंडा फडकला; स्नेहा दुबे यांनी मारली बाजी

SCROLL FOR NEXT