petrol-pump Google
नाशिक

मालेगावात अत्यावश्‍यक सेवेतील वाहनांनाच लॉकडाउन काळात इंधन पुरवठा

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पेट्रोलपंप केवळ अत्यावश्यक वाहनांना इंधन पुरवठ्यासाठी सुरू राहतील.

प्रमोद सावंत

मालेगाव (जि.नाशिक) : नाशिक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी १२ ते २३ मेच्या मध्यरात्री बारापर्यंत लॉकडाउनबाबत कडक निर्बंध लागू केले आहेत. या काळात अत्यावश्‍यक वाहनांनाच (essential service vehicles) इंधन पुरवठा करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येईल, असे नाशिक डिस्ट्रिक्ट पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशनचे (District Petrol Dealers Association) अध्यक्ष भूषण भोसले यांनी कळविले आहे. (In Malegaon only essential service vehicles will be refueled during lockdown)

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पेट्रोलपंप केवळ अत्यावश्यक वाहनांना इंधन पुरवठ्यासाठी सुरू राहतील. त्यांच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे सर्व शासकीय वाहने, रुग्णवाहिका, पोलिस वाहने, औषधे वाहने, सर्व मालवाहतूक वाहने छोटी व मोठी, ऑक्सिजन वाहतूक करणारी वाहने, शेती आधारित ट्रॅक्टर, हार्वेस्टर, जेसीबी व अन्य वाहने यांना पुरवठा करण्यात येईल. तसेच डॉक्टर, रुग्णालये, नर्स, वॉर्डबॉय, फार्मासिस्ट, सफाई कर्मचारी, बँक कर्मचारी, पोस्टमन, महावितरण, टेलिफोन व इंटरनेट सेवा पुरविणारे, पत्रकार आदींना ओळखपत्र तपासून इंधन देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

कोणाला मिळेल इंधन?

यासह ई-कॉमर्स डिलिव्हरी करणारे मोटारसायकल व मोठे वाहने यात अमेझॉन, फ्लिपकार्ट, झोमॅटो आदींचे वितरक, किराणा, दूध, मद्य, भाजीपाला, जेवण पार्सल सेवा घरपोच पुरविणारी वाहने, औषधे व ऑक्सिजन कंपन्यांमधील कर्मचारी, गॅस एजन्सी, पेट्रोलपंप कर्मचारी आदींना इंधन देण्यात येईल. अत्यावश्यक कामासाठी व रुग्णांसाठी खासगी बस, रिक्षा, टॅक्सी तसेच बाजार समित्या बंद असल्या तरी पर्यायी व्यवस्थेबाबत निर्णय घेणे असल्याने शेतकऱ्यांनाही इंधन देता येईल. कोरोना लसीकरणासाठी त्या दिवसाची नोंदणी असलेले नागरिक व कोणत्याही खासगी वाहनात रुग्ण असल्यास, तसेच शासनाने दिलेले सर्व ई-पास असलेल्या खासगी वाहनांना इंधन देण्याच्या सूचना आहेत. याबाबत वाद झाल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन महसूल विभागाने केले आहे. नागरिकांनी या काळात सहकार्य करावे. शहर व जिल्ह्यातील डीलर यांनी या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन भोसले यांनी केले आहे.

(In Malegaon only essential service vehicles will be refueled during lockdown)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivajinagar Assembly Election 2024 Result: सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी; सलग दुसऱ्यांदा आले निवडून

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT