Nashik Crime News : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे रविवारी रात्री वेहळगांव रस्त्याच्या बाजूला साकोरा येथील दिपक रमेश कदम याची पैशाच्या देवाण-घेवाणीच्या वादातून हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. (In Nandgaon taluka 2 accused in the murder of Isma are in police custody nashik crime news)
याबाबत नांदगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील संशयित आरोपी योगेश बाळासाहेब पगार व देवाजी दगा बोरसे राहणार साकोरा यांच्यावरती नांदगाव पोलीस ठाण्यात भा. द. वि कलम ३०२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील साकोरा- वेहळगाव रोडवर मुळ डोंगरी फाट्यावर रस्त्याच्या कडेला एक पुरुषाचा मृतदेह असल्याचे रुग्णवाहिका चालक शांतीनाथ राठोडला दिसल्याने साकोरा येथील काही मित्र तसेच पोलिस पाटील बाबासाहेब बोरसे यांना माहिती दिली.
यावर नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचत मृतदेहाची ओळख पटवली सदर मयत व्यक्ती दिपक रमेश कदम(३०) राहणार साकोरा असे समजले.
त्यास पैशाच्या देवाण-घेवाणीच्या वादातून योगेश बाळासाहेब पगार व देवाजी दगा बोरसे यांनी दगडाने व लोखंडी रॉड ने डोक्यात गंभीर दुखापत करून खून केला असून, सदर मयताचा अपघात झाला आहे. असा बनाव करून वेहळगांव रस्त्याच्या कडेला आणून टाकले होते.
याबाबत रविवारी सकाळी मयत दिपक, त्याचा भाऊ भाऊसाहेब, संशयीत आरोपी योगेश व देवाजी यांचेत आर्थिक व्यवहार झाले असल्याचे समजते. तसेच मयत दिपकचे एक वर्षापासून गावातील एका विवाहित महिलेबरोबर संबंध ठेवून संसार करीत होता.
त्यामुळे सुरूवातीला अनैतिक संबंधातून खून झाल्याचा संशय बळावला होता. मात्र पोलिसांनी लावलेल्या छड्यात आर्थिक व्यवहारातून खून झाल्याचे निष्पन्न झाले. सदर घटनेत वरील दोन संशयीत आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, अटक करण्यात आले आहे.
मयताची पत्नी मनीषा दिपक कदम राहणार साकोरा हिचे फिर्यादीवरून नांदगाव पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक भा. द. वी. कलम ३०२, ३४ प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.