crime esakal
नाशिक

Nashik Crime News : नवीन वर्षात गुटखा विक्रीचे समूळ उच्चाटन करण्याचे आव्हान; शहरात मात्र खुलेआम विक्री

गेल्या वर्षभरापासून नाशिक जिल्हा गुटखा मुक्त करण्याचा मानस डोळ्यासमोर ठेवून पोलिसांनी गल्लोगल्ली पिंजून काढले.यात कोट्यवधींचा माल हस्तगत झाला तर अनेकांना कार्यवाहिस सामोरे जावे लागले.

सकाळ वृत्तसेवा

सुदर्शन सारडा

Nashik Crime News : गेल्या वर्षभरापासून नाशिक जिल्हा गुटखा मुक्त करण्याचा मानस डोळ्यासमोर ठेवून पोलिसांनी गल्लोगल्ली पिंजून काढले.यात कोट्यवधींचा माल हस्तगत झाला तर अनेकांना कार्यवाहिस सामोरे जावे लागले.

गुटखा विक्रीस मज्जाव घातला गेला असला तरी रस्त्यावर दिसणाऱ्या रिकाम्या पुड्या आजही गुटखा विक्रीची साक्ष देत असताना मिशन पाच निमित्ताने सुरू केलेले अभियान गुटखा हद्दपार करेल का असा सवाल उपस्थित होत आहे.(In new year challenge is to completely eliminate sale of Gutka by police nashik crime news)

गुटखा विक्रीला राज्यात बंदी असताना रस्त्यांवर दिसणाऱ्या रिकाम्या पुड्या चर्चेचा विषय ठरत असताना जिल्हा पोलीसप्रमुख म्हणून शहाजी उमाप यांनी बंदीची कडक अंमलबजावणी करत गोपनीय पथके तयार केली. त्यांनी ग्रामीण मधील प्रत्येक गावात जात धाड सत्र सुरू केले.अनेकांवर कार्यवाही करत जेलवारी घडवली.

अशातच किरकोळ विक्रीला चाप बसला असताना पुडी बहाद्दर लोकांनी आपल्या मागणीचा मोर्चा बार कडे वळवला.आजमितीस घाऊक तर सोडाच पण चोरीचुपे विक्री करणाऱ्या टपऱ्यानी गुटखा म्हणजे जेल म्हणून तो विक्री करण्यास बंद केला. परंतु त्यातही काही छोट्या मोठ्या गुटखा माफियानी शहरातून आणत त्यास घरातून विक्री करण्याची शक्कल लढवल्याने पुड्या बहद्दरांना नवीन पत्ते आपोआप मिळून येत आहे.

आजही ग्रामीण भागात रस्त्यांवर दिसणाऱ्या रिकाम्या पुढ्या पोलिसांनाच आवाहन देत असताना नेमके हे रॅकेट कसे चालते याचा अभ्यास करण्याचे धाडस पोलीस प्रशासन दाखवणार का असा सवाल उपस्थित होत आहे. चारही बाजूंनी शहराला जोडणारे रस्ते हे ग्रामीण मधून शिरत असताना सबंधित यंत्रणा गुटखा वाहतुकी बाबत अनभिज्ञ कशी?

शहरात येणारे रस्ते:

गुजरात मार्गे पेठ रस्ता, सापुतारा मार्गे दिंडोरी रोड

मुंबई - नाशिक हायवे

सिन्नर-नाशिक हायवे

औरंगाबाद -येवला - निफाड नाशिक

धुळे-मालेगाव - चांदवड - नाशिक

पालघर -त्र्यंबकेश्वर - नाशिक

हरसूल - गिरणारे - नाशिक

-नाशिक ग्रामीण जिल्ह्यात गत वर्षापासून ०८ पथक व सध्या ०९ पथक हे कारवाई कामी मैदानात आहे.आजही दररोज सरासरी पाच अवैध धंद्यांवर धाड पडून माल मिळून येत आहेत त्याचे समूळउच्चाटन पथक करू शकलेले नाही ही वस्तुस्थिती आहे.

-पथकातील लोकांचे फक्त विभाग बदलले जात असून ते पथकात खूप दिवसापासून असल्याने तेथे भाकरी फिरवण्याचे आव्हान उमाप यांच्या समोर आहे.

-मालेगाव सारख्या ठिकाणी तीन पथक काम करीत असून अवैध धंद्यावर अंकुश येत नाही ही बाब गंभीर आहे.

-ज्या ठिकाणी मुद्देमाल पकडला जातो तेथील बीट अमलदार यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जाब विचारला जात नसल्याने पाहिजे तशी जरब बसवताना मोठी कसरत होत असल्याचे चित्र आहे.

शहरातून ड्रग्जची आउटगोइंग झाली,गुटख्याची इनकमिंग सुरूच..

मागील दोन महिन्या पूर्वी मुंबई पोलिसांनी शिंदे हद्दीत धाड टाकत जप्त केलेले तीनशे कोटींचे ड्रग्ज प्रकरण राज्याला हादरून सोडणारे असताना सबंधित माल मुंबईत व इतरत्र जाण्यासाठी जाणारा रस्ता ग्रामीण हद्दीतून जात असताना जीवाला घातकी असलेली ड्रग्जची तस्करी सर्रास कशी फत्ते झाली हा देखील चौकशीचा मुद्दा आहे.

आज जिल्हाभर डोळ्यात तेल घालून नऊ ते दहा भरारी पथके कानाकोपरा पिंजून काढत असताना शहरातून झालेली ड्रग्जची आउटगोइंग जरी रोखली नाही गेली तरी सर्रास सुरू असलेली गुटखा इनकमिंग रोखण्यात यश यावे इतकीच अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. ज्या छोट्या दुकानदारावर कारवाया झाल्या त्यांच्या मते जे घाऊक विक्रेते अथवा मूळ मालकावर कार्यवाही केल्यास गुटखा पूर्ण बंद होईल परंतु गरीब दुकानदारांवर कारवाया करून खरोखर चाप बसणार का हा मूळ प्रश्न कायम आहे.

(31 डिसेंबर 2023 पर्यंत आकडेवारी)

1).हस्तगत मुद्देमाल(कोटीत) - 16,51,14,781/-

2).दाखल गुन्हे : 846

3).आरोपी : 1006

4).भरारी पथक: 08

गुटखा विरोधी मोहीम सलग राबवत आहोत.काम थांबलेले नाही उद्देश गुटखा मुक्त जिल्ह्याचा आहे. एखाद्याला करायचे असेल तर त्याला 328 कलम खाली कार्यवाही सामोरे जावे लागेल सदर गुन्ह्यात दहा वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे.आमची धारणा एकच आहे लोकांनी यात जागृत व्हावं एवढ्या मोठ्या शिक्षेचा कुणीही अपराध करू नये.राज्यात गुटखा बंदी आहे आणि मुळात गुटखा हा जीवघेणा आहे त्यामुळे याचे समूळ उच्चाटन करायचे आहे हीच तळमळ आहे.

हेल्पलाईन नंबर दिलेले आहे पोलिसांच्या या मोहिमेला नागरिकांनी देखील पोलिसांना सहकार्य करावे आणि ते करत आहेत. आणखी कुठे ते चालत असेल तर त्याची माहिती द्यावी.घरातून विक्रीला देखील चाप लावून कठोर कारवाही केली जाणार आहे.''- शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक,नाशिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांचा ३१६५१ मतांनी विजयी

Shweta Mahale Won Chikhli Assembly Election 2024: चिखली विधानसभेत काँग्रेस विरुद्धच्या थरारक सामन्यात भाजपच्या श्वेता महाले विजयी!

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Tanaji Sawant won Tuljapur Assembly Election Result 2024 : राणाजगजितसिंह पाटील यांच्या पदरी 'जीत', तुळजापूरमध्ये कमळ फुलले

Miraj Assembly Election 2024 Results : मिरज मतदारसंघात सुरेश खाडेंनी ठाकरे गटाच्या तानाजी सातपुतेंवर 44,706 मतांच्या फरकाने केली मात

SCROLL FOR NEXT