onion Sakal
नाशिक

रामेश्‍वर कृषी बाजारात लाल कांदा दाखल, मिळाला उच्चांकी भाव

प्रमोद सावंत

उमराणे/मालेगाव (जि. नाशिक) : जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये उन्हाळी कांद्याची आवक वाढली असतानाच सोमवारी (ता. २०) येथील श्री रामेश्‍वर कृषी मार्केट महात्मा फुले नगर (खारीपाडा, ता. देवळा) येथे लाल कांदा विक्रीसाठी आला. दरेगाव येथील शेतकरी कौतिक राजाराम जाधव यांना हंगामात प्रथमच लाल कांदा बाजार आणण्याचा मान मिळाला. त्यांच्या कांद्यास सर्वाधिक ३ हजार १३१ रुपये क्विंटल असा उच्चांकी भाव मिळाला.


लाल कांदा बाजारात आणणारे कौतिक जाधव यांचा श्री रामेश्‍वर कृषी मार्केटतर्फे व्यापारी रघु काका (जापसन) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नवीन लाल कांद्याचे लिलाव प्रसंगी व्यापारी व उमराणेचे माजी सरपंच प्रकाश ओस्तवाल, प्रवीण बाफना, संतोष बाफना, चिंधू खैरे, बबनराव नेहारकर, आण्णासाहेब गांगुर्डे, नितीन काला तसेच शेतकरी भाऊसाहेब सोनवणे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. श्रीफळ वाढवून लाल कांदा लिलावास प्रारंभ करण्यात आला. श्री रामेश्‍वर कृषी मार्केटचे बाफना ट्रेडिंग कंपनीने ३ हजार १३१ सर्वोच्च बाजार भाव देऊन खरेदी केला.

लिलावाप्रसंगी श्री रामेश्‍वर कृषी मार्केटचे मुख्य संचालक श्रीपाल ओस्तवाल, पुंडलीक देवरे, नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू (काका) देवरे, सचिव दौलतराव शिंदे, व्यापारी दिनेश देवरे, हरिदास जाधव, दिनेश पारख, योगेश पगार, विलास आहिरे, सचिन देवरे व हमाल, मापारी उपस्थित होते.


उन्हाळी कांद्याची लगीनघाई

कसमादे भागात गेल्या वर्षी उन्हाळी कांद्याचे चांगले उत्पादन झाले. समाधानकारक भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा चाळींमध्ये राखून ठेवला. यावर्षी देखील समाधानकारक पाऊस झाला आहे. नवीन लाल कांद्याचे उत्पादन दृष्टीक्षेपात आल्याने व उन्हाळी कांद्याचे भाव पंधराशेच्या आसपास राहत असल्याने शेतकऱ्यांनी राखून ठेवलेला कांदा बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. मालेगाव बाजार समितीच्या मुंगसे कांदा खरेदी-विक्री केंद्रावर रोज दहा हजार क्विटलच्या आसपास उन्हाळी कांदा विक्रीसाठी येत आहे. सोमवारी जास्तीत जास्त भाव १८०० रुपये होता. सरासरी बाजार भाव चौदाशे ते पंधराशेच्या दरम्यान आहे. साधारणत: दसऱ्यापासून लाल कांदा बाजारात येण्यास सुरुवात होते. त्यामुळे आगामी काही दिवस बाजार समित्यांमध्ये उन्हाळी कांद्याची रेलचेल दिसून येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है' राहुल गांधींनी उघडली तिजोरी अन् निघाला अदानी-मोदींचा फोटो, Video Viral

Latest Maharashtra News Updates : नाशिकमधील रेडीसन ब्लू हॉटेलवर निवडणूक आयोगाची कारवाई

ऋषभ पंतसारखाच आणखी एका क्रिकेटपटूचा भीषण अपघात; गाडीचा झालाय चुराडा...

भावासाठी उदयनराजे मैदानात! 'झुकेगा नही साला' म्हणत, कॉलर उडवत शिवेंद्रराजेंना मताधिक्‍याने विजयी करण्याचं केलं आवाहन

Nawab Malik : मतदानाच्या एक दिवस आधीच नवाब मलिक यांचे 'एक्स' अकाऊंट हॅक

SCROLL FOR NEXT