chhagan Bhujbal during Inauguration of consumer awareness center esakal
नाशिक

ग्राहक प्रबोधन केंद्र ही अभिमानाची बाब; छगन भुजबळ

कुणाल संत

नाशिक : ग्राहकांना त्यांचे हक्क व कायद्याची माहिती होण्यासाठी ग्राहक प्रबोधन केंद्र खूप उपयोगी पडणार आहे. देशातील पहिले ग्राहक प्रबोधन केंद्र (Consumer Awareness Center) सुरू झाले असून, ही बाब नक्कीच नाशिक शहरासह जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे गौरवोद्गार अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी काढले. (Inauguration of first Consumer Awareness Center by chhagan Bhujbal in Nashik News)

वैधमापन शास्त्र विभाग, महापालिका (NMC) व नाशिक फर्स्ट (Nashik first) यांच्यातर्फे ट्रॅफिक पार्क (Traffic Park) संस्थेच्या परिसरात देशातील पहिले कायमस्वरूपी ग्राहक प्रबोधन केंद्राचे उद्‌घाटन श्री. भुजबळ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. वैध मापनशास्त्र यंत्रणेचे नियंत्रक डॉ. रवींद्रकुमार सिंगल, वैद्यमापन शास्त्र विभाग नाशिकचे सहनियंत्रक नरेंद्र सिंह, उपनियंत्रक जयंत राजदेरकर, बाळासाहेब जाधव, नाशिक फर्स्टचे अध्यक्ष अभय कुलकर्णी, संचालक सुरेश पटेल व ग्राहक पंचायत समितीचे अध्यक्ष सुधीर काटकर उपस्थित होते.

श्री. भुजबळ म्हणाले, की ग्राहक अनेकदा खरेदीवेळी फसला जातो. त्यामुळे त्याच्या तक्रारी वाढतात. ग्राहकांच्या फसवणुकीला आळाही बसला पाहिजे. आळा बसण्यासाठी हे केंद्र नक्कीच बहुउपयोगी ठरणार आहे. ग्राहक प्रबोधन केंद्राच्या माध्यमातून जास्तीत जास्त ग्राहक जोडले जाऊन त्यांचे प्रबोधन करण्यासाठी प्रचार व प्रसिद्धीचे कार्यक्रम राबविले जावेत. राज्यातील प्रत्येक विभागात, त्यानंतर जिल्हा स्तरावर ग्राहक प्रबोधन केंद्र उभारावीत, असे आवाहनही त्यांनी केले. शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला शालेय जीवनापासून वाहतूक नियम व ग्राहक हक्क व कायद्याची माहिती होईल. पेट्रोल डिझेलमध्ये सध्या बायोडिझेलच्या नावाखाली मोठी फसवणूक होते. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत असल्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.

डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी ग्राहक प्रबोधन केंद्रांची आवश्यकता व उपयुक्तता सांगत ग्राहक संरक्षण आणि वैधमापन शास्त्र विभागाचे काम माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत असते. वैधमापन शास्त्र विभागासाठी ग्राहक प्रबोधन केंद्र एक नवी सुरवात आहे. संकेतस्थळाच्या माध्यमातून सर्व नोंदी घेतल्या जात असल्याने या विभागाचे पारदर्शकपणे काम सुरू आहे. या विभागाची अधुनिकीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT