While felicitating Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Rural Development Minister Girish Mahajan, Guardian Minister Dada Bhuse, former corporators Priyanka Mane, Dhananjay Mane, Ruchi Kumbharkar, Machindra Sanap, former corporator Poonam Mogre, former corporator Hemant Shetty, Shiv Sena upazila chief Digambar Mogre and others. esakal
नाशिक

Devendra Fadnavis Nashik Daura : स्व. सदाशिव गंगाराम भोरे नाट्यगृहाचे लोकार्पण

स्व. सदाशिव गंगाराम भोरे नाट्यगृहाचे शनिवारी (ता. १०) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फित कापून लोकार्पण करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

Devendra Fadnavis Nashik Daura : हिरावाडीतील सर्व्हे नंबर २१० व २११ महापालिकेच्या सहा एकर जागेत सुमारे २५ कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक पद्धतीने उभारलेल्या स्व. सदाशिव गंगाराम भोरे नाट्यगृहाचे शनिवारी (ता. १०) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फित कापून लोकार्पण करण्यात आले. (Inauguration of Sadashiv Gangaram Bhore Theatre by Devendra Fadnavis Nashik news)

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री दादा भुसे, पर्यटन व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हाधिकारी जलज शर्मा, आमदार ॲड. राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे, माजी आमदार बाळासाहेब सानप, संघटनमंत्री विजय चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आदींसह मान्यवर उपस्थित होते. लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक प्रियांका माने, धनंजय माने, पूनम मोगरे, रुची कुंभारकर, मच्छिंद्र सानप, प्रियांका माने, दिगंबर मोगरे, यांनी केले होते.

हिरावाडीत स्व. सदाशिव गंगाराम भोरे यांच्या नावाने उभारलेल्या कलामंदिराचे सहा एकर जागेत २९०० चौरस मीटर बांधकाम केले असून बांधकामाच्या पश्चिमेला वाहनतळ प्रशस्त व्यवस्था केली आहे. नाट्यगृहात अत्याधुनिक सुविधा असून दोन्ही बाजूला प्रसाधनगृह व्यवस्था आहे. कलाकारांना तालीम करण्याची गरज भासल्यास त्यांच्यासाठी दोन्ही मजल्यावर स्वतंत्र दोन तालीम हॉल आहे.

भव्य रंगमंच, सुसज्ज असा मेकअप रूम, प्रकाशयोजना, ध्वनिव्यवस्था, स्वयंचलित सरकते पडदे, बाल्कनीत १५०आणि खाली ५०० अशा ६५० खुर्च्यांची आसन व्यवस्था केली आहे. या वेळी गणेश भोरे, राजू भोरे, मंदार जानोरकर, अजय निकम, महेश महंकाळे, माजी सभापती उद्धव निमसे, माजी नगरसेवक हेमंत शेट्टी, शंकर हिरे, चंद्रशेखर पंचाक्षरी, राहुल कुलकर्णी, श्याम महाजन, अमित घुगे, प्रमोद सोनवणे,प्रवीण भाटे आदींसह नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT