Nashik News : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती (उमेद) अभियानांतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत १४ ते ३१ ऑगस्ट कालावधीत रानभाज्या व राखी महोत्सवाचे आयोजन केल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांनी दिली आहे. (Inauguration of vegetable Rakhi festival tomorrow nashik news)
महोत्सवाचे उद्घाटन सोमवारी (ता. १४) सकाळी अकराला नाशिक पंचायत समिती आवारात केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष उपस्थितीत, राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. आदिवासी भागात विशेष करून पावसाळ्यात रानभाज्याचे प्रमाण अधिक असते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
दुर्मिळ रानभाज्या व औषधी गुणधर्माचे महत्त्व शहरी नागरिकांना कळावे, चव घेता यावी, याकरिता महोत्सवाचे आयोजन केले आहे.
महोत्सवात राख्या, तसेच ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या शोभेच्या, हस्तकलेच्या वस्तू व विविध खाद्यपदार्थ असणार आहेत. ग्रामीण महिलांनी उत्पादित केलेल्या हस्तकलेच्या वस्तू व नैसर्गिक पद्धतीने पिकविलेल्या रानभाज्या या महोत्सवात उपलब्ध होणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.