Nashik IT Raid : नाशिकच्या बांधकाम व्यावसायिकांना धक्का देणारा आजचा दिवस ठरला. आज (ता.२०) सकाळपासून आयकर विभागाने जवळपास दहा बांधकाम व्यावसायिकांचे कार्यालय, निवासस्थानावर धडक मारून विचारपूस केली.
आयकर विभागाने अचानक मारलेल्या धाडीमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली. (Income Tax Department raids on builders in nashik news)
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
औरंगाबाद, पुणे, नाशिक विभागातील अधिकाऱ्यांच्या पथकाने आज दहा बांधकाम व्यावसायिकांवर छापा टाकला. पथकामध्ये एकूण २७ अधिकारी असल्याची माहिती समोर येत आहे. जवळपास ४७ ठिकाणी छापे टाकण्यात आले.
या संदर्भातील माहिती गुप्त ठेवण्यात आली असून तपशील बाहेर आला नाही. पहाटे पाच वाजेपासून शहरात आयकर विभागाचे धाडसत्र सुरू होते. औरंगाबाद येथून शालेय वाहनातून पथक शहरात दाखल झाले.
महात्मा गांधी रोड, जेलरोड, नाशिक रोड, महात्मा नगर, कॉलेज रोड, गंगापूर रोड या भागात आयकर विभागाने धाडसत्र अवलंबिले. धाडी टाकताना पोलिस बंदोबस्त घेण्यात आला होता. शहरभर सुरू असलेल्या विविध प्रकारच्या चर्चांना उधाण आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.