Farmer Loss News esakal
नाशिक

Nashik News : ऐन रब्बी हंगामात शेतकऱ्यांची गैरसोय

सकाळ वृत्तसेवा

देवगाव : गेल्या तीन दिवसांपासून कानळद ३३/११ विद्युत उपकेंद्राला वीजपुरवठा करणारी मुख्य ३३ केव्ही भूमिगत केबल जळाल्याने उपकेंद्राचा वीजपुरवठाच बंद झाला आहे. त्यामुळे या उपकेंद्रांतर्गत येणारी वाकद, शिरवाडे, कानळद, कोळगाव या चार गावांचा वीजपुरवठाच खंडित झाल्यामुळे ही गावे अंधारात असून, ऐन रब्बी हंगामात शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे.

तत्कालीन पालकमंत्री व मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून कानळद येथे तब्बल चार कोटी रुपये खर्चून हे उपकेंद्र उभारण्यात आले. या उपकेंद्राला महावितरणच्या देवगाव केंद्रातून ३३ केव्ही वीजपुरवठा केला जात असून, देवगाव फाटा ते शिरवाडे फाटा या तीन किलोमीटरमध्ये भूमिगत केबल टाकण्यात आली आहे. (Inconvenience of farmers during in Rabi season Nashik News)

तीन किलोमीटर अखंड केबल मिळत नसल्यामुळे ठिकठिकाणी केबलला जोड द्यावा लागला. त्यामुळे दोन वर्षांत या केबलमध्ये वारंवार बिघाड होत आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी या केबलमध्ये बिघाड झाल्यामुळे गावातील वीजपुरवठाच खंडित झाला आहे.

कार्यकारी अभियंता आर. एस. आव्हाड, उपकार्यकारी अभियंता पी. बी. सोनवणे, कनिष्ठ अभियंता ए. टी. पाटील यांनी कर्मचाऱ्यांसह डेरेदाखल होत केबल दोष दुरुस्तीसाठी युद्धपातळीवर रात्रभर प्रयत्न केले. मात्र दोष न सापडल्याने तिसऱ्या दिवशीही विद्युत उपकेंद्र बंदच राहिल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे.

या तांत्रिक अडचणीमुळे ही गावे तब्बल तीन दिवसांपासून अंधारात आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांनी गहू पेरणी, कांदेलागवड केली आहे. मात्र त्यांना पाणी देता आले नाही. त्यामुळे तांत्रिक दोष कायमस्वरूपी निकाली काढून शेतकऱ्यांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, आमदार भुजबळांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांनीही भेट देत तत्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

"गेल्या दोन वर्षापूर्वी कानळद उपकेंद्र सुरू झाले असुन देवगाव फाटा ते शिरवाडे फाटा दरम्यान भुमिगत केबलणे विद्युत पुरवठा केला जात असून गुरुवार(ता.२४) सकाळी ७:३० वा नादुरुस्त झाली.विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण च्या कर्मचाऱ्यांनी काम करीत आहे उद्या सकाळपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत होईल."

कनिष्ठ अभियंता ए.टी.पाटील

कानलद उपकेंद्र

देवगाव ते कानळद या मार्गावरून लाईनची प्रकल्पीय मंजुरी होती.परंतु देवगाव उपकेंद्रातुन पूर्वीच तीन लाईन गेल्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी विरोध केला.त्यामुळे देवगाव फाटा - शिरवाडे फाटा या मार्गाने मुख्य विद्युत वाहिनी नेत असताना तेथील शेतकऱ्यांनीही हरकत घेतली.त्यामुळे ३३केव्हीं भुमिगत केबलद्वारे विद्युत पुरवठा नेण्यात येऊन उपकेंद्र सुरू करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT