Girls Birth Rate Increase  esakal
नाशिक

Girl Birth Rate Increase : कोरोनानंतर मुलींच्या जन्मदरात वाढ; लिंगाची विचारणा करण्यांविरुद्ध गुन्हे

सकाळ वृत्तसेवा

Girl Birth Rate Increase :कोरोना काळात नाशिक महापालिका हद्दीमध्ये मुलींच्या जन्मदरात घट झाली होती. परंतु कोरोनानंतर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात मुलींच्या जन्मदरात वाढ झाली आहे. या वर्षात ऑगस्ट पर्यंत एक हजार मुलांमागे ९१५ मुली जन्माला आल्या आहेत.

गर्भधारणापुर्व व प्रसूतिपूर्व (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ सुधारीत २००३ या कायद्यान्वये सल्लागार समितीची बैठक महापालिका मुख्यालयात पार पडली. (Increase in birth rate of girls after Corona nashik news)

महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, डॉ. तान्हाजी चव्हाण, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत शेटे, जिल्हा विधी समुपदेशक अॅड. सुवर्णा शेपाळ, स्रीरोग तज्ज्ञ डॉ. जोगेश बच्छाव, कायदेशीर सल्लागार अॅड. रेवती कोतवाल, बालरोग तज्ञ डॉ. शलाका बागुल, डॉ. रीना काळदाते, रेडीओलॉजिस्ट डॉ. संजय देसले आदी उपस्थित होते.

महापालिका हद्दीत मागील पाच वर्षात मुलींचा मुलींचा जन्मदर कमी होत असल्याचे निदर्शनास आले होते. प्रामुख्याने कोविड नंतरच्या कालावधीमध्ये मुलांचा जन्मदर घसरल्यानंतर कठोर पावले उचलण्यात आली. त्याचा परिणाम म्हणून २०२३ मध्ये जन्मदर वाढल्याचे दिसून आल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.

यावेळी समिती सदस्यांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना पोचविण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक १८००२३३४४७५ जाहीर करण्यात आला. शासनाने निर्गमित केलेले बक्षीस योजना जाहीर करण्यात आली. संशयित सोनोग्राफी केंद्राची माहिती दिल्यास व त्या केंद्रावर गुन्हा दाखल झाल्यानंतर शासनाकडून एक लाख रुपये बक्षीस जाहीर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

लिंगाची विचारणा करणाऱ्यांवर गुन्हे

गर्भवती मातेची सोनोग्राफी करताना अथवा केल्यानंतर बाळाचे लिंग काय आहे अशी विचारणा देखील केली जात असल्याने आता विचारणा करणाऱ्या नातेवाईकांविरुद्ध देखील या कायद्यान्वये गुन्हा दाखल केला जाणार आहे.

मुलांचा जन्मदर वाढविण्यासासाठी व बेकायदेशीररीत्या गर्भलिंगनिदान चाचण्यांवर अंकुश ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जाणार आहेत. महापालिका कार्यक्षेत्रात सोनोग्राफी केंद्रांची दर तीन महिन्यांनी तपासणी केली जाते. संशयास्पद ठिकाणी पथकामार्फत चौकशी केली जाणार असून अनियमितता आढळल्यास सेंटरवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

पाच वर्षातील मुलींचा जन्मदर

वर्ष जन्मदर

२०१९ ९२०

२०२० ९१२

२०२१ ९११

२०२२ ८८५

२०२३ (ऑगस्ट) ९१५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT