Increase in cases of abduction of girls Harsul Ghoti ugaon nashik crime news esakal
नाशिक

Nashik Crime : मुली पळविण्याच्या प्रकरणातून वाढते तेढ; हरसूल, घोटी नंतर उगावला प्रकार

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : देशात आंतरजातीय आणि आंतरधर्मीय प्रेम प्रकरणात मुलींना पळवून नेण्याच्या प्रकारातून तेढ वाढत असताना नाशिकही याला अपवाद राहिलेले नाही.

उगाव (ता.निफाड) ला विवाहितेने नुकतेच अठरा वर्ष पूर्ण झालेल्या मुलीला फूस लावून संमोहीत करीत अजमेरला पळवून नेण्याचा प्रकार उघडकीस आला. (Increase in cases of abduction of girls Harsul Ghoti ugaon nashik crime news)

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या आमदार देवयानी फरांदे, शहराध्यक्ष गिरीश पालवे, लक्ष्मण सावजी आदीच्या शिष्टमंडळाने पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांची भेट घेत उगाव (ता.निफाड) येथील आंतरधर्मीय मुलगी पळविण्याचा प्रकार हा लव जिहादचा असल्याने याची सखोल चौकशी करीत संशयितांवर कठोर कारवाईची मागणी केली. त्यामुळे नाशिकला मुलींना पळवून नेण्याचा प्रकार पुन्हा चर्चेत आला आहे.

श्री सोमय्या म्हणाले की, दोन मुलींचा बाप असलेल्या एकाने दोन दिवसांपूर्वी अठरा वर्ष पूर्ण झालेल्या मागासवर्गीय मुलीला अजमेरला पळवून नेल्याचे लक्षात येताच ग्रामीण पोलिसांनी ४८ तासात मुलगी कुटुंबाच्या ताब्यात सुपूर्द केली आज याच कुटुंबातील सदस्यासोबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांची भेट घेत संशयितांवर कठोर कारवाईची मागणी केली.

संशयितांचा माग काढून ४८ तासात मुलीला कुटुंबाच्या ताब्यात देण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. आधी विवाह आणि दोन मुल असताना जेमतेम दोन आठवड्यापूर्वी अठरा वर्षे पूर्ण झालेल्या मुलीला तावीत बांधून संमोहीत करून तिला अजमेरला नेण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या प्रकारात संशयित अजून पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मुलीला फसविण्याच्या या प्रकाराची चौकशी करीत संशयिताला कठोर शासन व्हावे, या एकमेव मागणीसाठी पोलिस अधिक्षकांची भेट घेतली.

मोडस आपरेंडी तपासा

सोमय्या म्हणाले, की निफाडच्या प्रकारात मुलीला फसविण्यासाठी पद्धतशीरपणे नियोजन दिसते. आधी अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढले गेले. त्यानंतर ती अठरा वर्षे पूर्ण होण्याची वाट पाहिली गेली. १८ वर्षाची होताच तिला पळवून नेले गेले. त्यानंतर तावीत बांधून तिला संमोहीत केले गेले.

"जिल्ह्यात मुली पळविण्याच्या प्रकारातून तेढ वाढत असलेल्या प्रकरणाची स्वतंत्र आकडेवारी नाही. उगाव आणि भरवीर येथील विषय स्वतंत्र आहे. भरवीर (ता.घोटी) येथील प्रकारात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात संशयिताच्या दारासमोर जीव दिलेल्या मुलीच्या आई-वडीलांच्या मृत्यूला प्रवृत्त केल्याप्रकरणी कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. तर चुकीच्या ठिकाणी मृतदेह जाळण्याच्या प्रकाराबाबत गुन्हा दाखल झाला आहे. उगाव येथील २७ मे स प्रकार घडला. त्यात मुलगी कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आली आहे."- शहाजी उमाप, पोलिस अधीक्षक, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT