Crime News Sakal
नाशिक

Nashik Increasing Crime : पोलीस सुस्तावल्याने शहरात गुंडागर्दीत वाढ!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : काही दिवसांपूर्वी अंबड परिसरात धारदार हत्यारे घेऊन नागरिकांच्या घरांवर दगडफेक करीत दहशत माजविल्याची घटना ताजी असताना, पुन्हा सिडकोत एका युवकाच्या शोधात हातांमध्ये कोयते, हत्यारे घेऊन फिरणाऱ्या टोळक्यांमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे, शहरात सर्रास कोयत्याने वार करण्याच्या घटनाही वाढल्याने शहरात पोलिस आहे की नाही, असाच प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

शहरात गुन्हेगारी घटना पुन्हा वाढू लागल्याचे चित्र आहे. टवाळखोरांच्या हातांमध्ये सर्रास हत्यारे दिसू लागली आहेत. काही दिवसांपूर्वीच अंबड परिसरातील दत्तनगरमध्ये परप्रांतीयांच्या दोन गटामध्ये झालेल्या वादातून एका गटातील १५-२० टवाळखोरांनी हातात कोयते व हत्यारे घेऊन रात्री नागरिकांच्या घरांवर दगडफेक करीत दहशत माजविली होती. या घटनेला काही आठवडेच झाले असताना, पुन्हा सिडकोतील महाकाली चौकात मागील भांडणाची कुरापत काढून वाद घातला. (Increase in crime in city due to laxity of police Nashik Latest Crime News)

या वेळी एका युवकाला आपला जीव वाचविण्यासाठी एका घराचा आश्रय घ्यावा लागल्याचे व त्याचा पाठलाग करणाऱ्यांच्या हाती कोयते आणि धारदार हत्यारे असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. यावरून टोळक्यांच्या हाती इतक्या मोठ्या प्रमाणात हत्यारे बाळगून वावरतात. या बाबींची पोलिसांना सुतराम माहिती नसावी याबाबत आश्‍चर्य व्यक्त होते आहे. पोलिसांच्या सुस्तावलेपणामुळे अशा टवाळखोरांच्या माध्यमातून शहरात नव्याने गुंडागर्दी सुरू होऊन गुन्हेगारी वाढण्याचीच शक्यता आहे.

पोलिस गस्ती नावाला

लुटमारीसह किरकोळ कारणावरून धारदार हत्यारे व कोयत्याचा वापर मारहाणीचा होत आहे. यासंदर्भात सातत्याने गुन्हे दाखल होत असताना, पोलिसांकडून मात्र अशा टवाळखोरांविरुद्ध कारवाई करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाही. त्यामुळे टवाळखोरांमध्येच गँगवार होऊन भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांकडून गस्ती पथके नेमलेली असतानाही टवाळखोर भररस्त्यावर हत्यारे बाळगत वावरत असल्याचे दहशतीचे वातावरण आहे. तर पोलिस मात्र सुस्तावलेल्या अवस्थेत असून कोणतीही कारवाई होताना दिसत नसल्याने शहरात पोलिस आहेत की नाही, असाच प्रश्‍न उपस्थित होतो आहे.

तिघांना अटक

महाकाली चौकातील टवाळखोरांच्या वादप्रकरणी अंबड पोलिसात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून, याप्रकरणी तिघांना अटक झाली आहे. आदित्य तायडे (रा. राजरत्न गार्डनसमोर, राजरत्ननगर, सिडको) या युवकाच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (ता.१) रात्री साडेअकराच्या सुमारास महाकाली चौकात संशयित अजय परदेशी व अमोल पाटली यांनी मागील भांडणाची कुरापत काढून धारदार हत्याराने वार करून जखमी केल्याचा प्रकार घडला.

या प्रकरणात संशयित अमोल पाटील यास अंबड पोलिसांनी अटक केली आहे. तर अजय मनोज परदेशी (रा. गोपाल चौक, कामटवाडे गाव) याच्या फिर्यादीनुसार, संशयित मधुर उघाडे, राज शिंपी, आदित्य तायडे व अन्य साथीदारांनी मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करीत धक्काबुक्की करीत धारदार हत्याराने परदेशी याच्या डोक्यात मारून दुखापत केली. याप्रकरणी अंबड पोलिसांनी मधुर उघाडे, राज शिंपी या दोघांना अटक केली असून, परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Latest Marathi News Updates live : लाडक्या बहिणींना आता महिन्याला 2100 रुपये मिळणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT