Fish Rates Hike esakal
नाशिक

Fish Rates Hike: 500 रुपयांनी मासे दरांमध्ये वाढ! वादळ, पावसाच्या अंदाजाने आवक घटली

सकाळ वृत्तसेवा

Fish Rates Hike : वादळ वारा तसेच पावसाचा अंदाजाने बोटींना समुद्रात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याचा परिणाम मासेमारीवर झाला आहे. सरासरी पाचशे रुपयांनी मासे दरांमध्ये वाढ झाली आहे, अशी माहिती विक्रेत्यांकडून देण्यात आली. (Increase in fish rates by Rs 500 Inflow decreased due to storm rain forecast nashik news)

समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणावर मासेमारी सुरू असते. समुद्रात बोटींच्या माध्यमातून दूर जाऊन मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते. राज्यात पावसाची चाहूल लागली आहे. बहुतांशी ठिकाणी पाऊस पडत आहे.

त्यात प्रचंड वादळ वारा निर्माण झाला आहे. अशा वेळेस समुद्रात वादळ येऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून समुद्रात बोटी घेऊन जाण्यास बंदी करण्यात आली आहे. मासेमारी मोठ्या प्रमाणावर ठप्प झाली आहे.

मासे येण्याचे प्रमाण घटले आहे. इतर राज्यातून माशांची आवक केली जात आहे. यामुळे मासे विक्री व्यवसायावर परिणाम झाला आहे. दरात प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा सरासरी किलोमागे ४०० ते ५०० रुपये वाढ झाली आहे.

नदीच्या माशांना वाढली मागणी

समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या बोटींना बंदी करण्यात आल्याने समुद्री मासे बाजारात येण्याचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे घरांमध्ये वाढ झाली आहे. व्यवसायिकांकडून नदीच्या माशांना मागणी वाढली आहे.

समुद्री माशांची कमी भरून काढण्यासाठी नदीचे मासे विक्रीकडे कल वाढला आहे. नदीत मासेमारी करणाऱ्यांकडे विक्रेत्यांकडून माशांची मागणी केली जात आहे.

बाजारात माशांची आवक कमी झाल्याने मासे विक्रेत्यांकडून परराज्यातील व्यावसायिकांकडे माशांची मागणी वाढली आहे. ओरिसा, गुजरात, कलकत्ता या राज्यांमधून माशांची आवक केली जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

"पावसाळा आणि समुद्रातील वादळाचे प्रमाण लक्षात घेता मासेमारीच्या बोटी समुद्रात जाण्यास बंदी करण्यात आली. माशांची आवक घटली आहे. त्यामुळे माशांच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. सुरमई माशांच्या दरात सर्वाधिक दुप्पट वाढ झाली आहे."- नीलेश सोपे, विक्रेता

असे आहेत दर

माशांचे प्रकार दर

मागील सध्याचे

सुरमई ७०० ते ८०० १ हजार २०० ते १ हजार ४००

रावस ७०० ते ८०० १ हजार २०० ते १ हजार ४००

हलवा ६०० १ हजार

वाम ७०० ते ८०० १ हजार ४००

पापलेट ८०० १ हजार ४००

कोळंबी ५०० ७००

बोमील २०० ५००

बांगडा २०० ५००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT