Slight rise in water level of Manikpunj Dam due to Thursday rains. esakal
नाशिक

Rain: माणिकपुंज धरणाच्या साठ्यात वाढ! मन्याड, चांदेश्वरी खोऱ्यातील पावसाने हातभार, अजूनही पावसाची आवश्यकता

सकाळ वृत्तसेवा

नांदगाव : तालुक्यातील कासारी, चांदेश्वरी व मन्याड खोऱ्यात तुरळक हजेरी लावत झालेल्या परतीच्या पावसामुळे माणिकपुंज धरणातील जलाशयाच्या साठ्यात पंधरा दशलक्ष घनफुटाने पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.

धरण क्षेत्रातील खोऱ्याच्या भागातील डोंगररांगेवर तुरळक का होईना पाऊस होत असल्याने माणिकपुंज धरणाच्या पाण्याच्या पातळीत अजूनही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Increase in Manikpunj dam stock Manyad contributed by rains in Chandeshwari valley still needs rains nashik)

माणिकपुंज धरणातील एकूण मृतसाठा हा १६० दशलक्ष घनफूट असून सध्याचा शिल्कक मृतसाठा ८० दशलक्ष घनफूट एवढाच बाकी राहिला असल्याने त्यात कासारी, चांदेश्वरी व नारळा भागात गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास हातभार लागला.

पंधरा दशलक्ष घनफुटाने पाण्याच्या पातळीत भर पडली असली तरी उर्वरित मृतसाठ्यात अपेक्षित वाढ होण्यासाठी अजूनही मुसळदार द दमदार पावसाची गरज आहे.

गुरुवारच्या पावसामुळे कासारी घाटाजवळील चांदेश्वरी लघु प्रकल्प ओसंडून वाहण्यासाठी काही फूट बाकी होता मात्र चांदेश्वरी सोबत गुळमोडीदेखील पूर्ण ओसंडून वाहने बाकी आहे.

ते भरल्यावर माणिकपुंज भरण्यास मदत होईल अशी आशादायक स्थिती कालच्या पावसामुळे मात्र निर्माण झाली आहे.

माणिकपुंज, नाग्यासाक्या, चांदेश्वरी, गुळमोडी, लोहशिंगवे, भालूर, मांडवडवाडी, रणखेडा, पोखरी अशी सर्व मिळून धरणे भरली तर तालुक्यातील जवळपास सात हजार हेक्टर क्षेत्र सिंचन योग्य बनते, मात्र सध्या रब्बीवर कमी पावसामुळे मोठा परिणाम मात्र झाला आहे.

दहेगावमध्ये जेमतेमच साठा

तालुक्याची प्रत्यक्षातली पाण्याची गरज व उपलब्ध पाणी याचा मेळ बसण्यासाठी दमदार पावसाची आवश्यकता मात्र आहे. माणिकपुंज, मन्याड, नाग्यासाक्या या धरणापैकी केवळ माणिकपुंजमध्ये तुटपुंजी वाढ वगळता अन्य जलाशय अजूनही जैसे थे स्थितीत आहे.

शाखांबरी, लेंडी, पांझण मन्याड या प्रमुख नद्याही अजूनही कोरड्याठाकच आहेत, शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दहेगाव धरणात जेमेतेम साठा शिल्लक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती 200 पार; महाविकास आघाडीची मोठी निराशा

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

SCROLL FOR NEXT