अरुण हिंगमिरे : सकाळ वृत्तसेवा
बोलठाण : नांदगाव तालुक्यात मागील पाच ते सहा वर्षांपासून बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाई केली जात आहे. मात्र असे असतानाही तालुक्यात बोगस डॉक्टरांची प्रॅक्टिस सुरु असल्याचे मागील दोन महिन्यात करण्यात आलेल्या कारवाईवरुन स्पष्ट झाले आहे.
तालुक्याच्या आरोग्य विभागातील अपुऱ्या संख्याबळामुळे या बोगस डॉक्टरांवरील कारवाई संथगतीने होत असल्याचे बोलले जात आहे.
सद्य:स्थितीत तालुक्यात ७४ बोगस डॉक्टर कार्यरत असून यातून चार जाणांवर कारवाई झाली असून अद्यापही ७० जण कारवाई होणे बाकी आहे. (increase in number of bogus doctors in Nandgaon 74 fake doctors working in taluka nashik)
नांदगाव तालुका तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ससाने यांच्या कार्यकाळात त्यांनी ग्रामीण भागात विशेष मोहीम राबवून त्यावेळी १३० पेक्षा जास्त बोगस विनापरवानाधारक बंगाली बाबू आणि इतरांची जंत्री काढून त्यांना नोटीस बजावून वैद्यकीय सेवा बंद करण्यात आली तर कारवाईच्या भितीपोटी ८२ बोगस डॉक्टरांनी नांदगाव सोडले.
नोटीस बजावून देखील ज्या बोगस डॉक्टरांनी आपला व्यवसाय सुरू ठेवला त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यानंतर राहिलेल्या ४८ बोगस डॉक्टरांवर कारवाई होण्यापूर्वी वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली झाली. त्यानंतर मागील चार वर्षात आता बोगस डॉक्टरांची संख्या ४८ वरून ७४ वर पोचली आहे.
चार बोगस डॉक्टरांवर कारवाई
ऑगस्ट २०२१ पहिली तक्रार नांदगाव तालुक्यातील मेडिकल युनियनचे नेते प्रवीण गुप्ता आणि जातेगाव येथील रंगनाथ चव्हाण यांनी तथाकथित स्वतःला डॉक्टर म्हणवून घेणाऱ्या मुन्नाभाई एमबीबीएस वर केली होती.
त्यानंतर ७४ पैकी ४ शासनाच्या निकषात बोगस डॉक्टर आहे, किंवा त्यांनी घेतलेले शिक्षण प्रत्यक्ष वेगळे असताना ऍलोपॅथिक प्रॅक्टिस करत आहेत, अशा वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष जगताप यांनी मागील काही दिवसात केली.
५० टक्के पदे रिक्त
तालुक्यातील बोगस डॉक्टरांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागात मुळात मंजुर पदापैकी ५० टक्के पदे रिक्त आहे. त्यामुळे कारवाई हवी त्या ताकदीने होत नसल्याची चित्र आहे.
नांदगाव तालुक्यात पाच प्राथमिक आरोग्य तर २१ उपक्रेंद आणि कळमदरी येथे आर्युवेदिक दवाखाना आहे. यासाठी १०१ पदे मंजूर आहे. मंजूर पदांपैकी ५८ पदे रिक्त आहेत. यात आरोग्य सेवक, सेविका यांची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहे.
मागील काही वर्षांपूर्वी अशा बोगस डॉक्टरांचे समूळ उच्चाटन व्हावे यासाठी शासनाने उदात्त हेतूने संपूर्ण राज्यात कंत्राटी पद्धतीने समुदाय वैद्यकीय अधिकारी हे पद निर्माण केल्याप्रमाणे तालुक्यात देखील सर्व १६ आरोग्य उपकेंद्राच्या ठिकाणी समुदाय वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
मात्र ते देखील नियमित हजर राहत नसल्याने तालुक्यात आरोग्य सेवा उपलब्ध मनुष्यबळावर केली जात आहे. यामुळे बोगस डॉक्टरांचे चांगलेच फावत असून त्यांचे दुकाने (दवाखाने) बिनबोभाट चालू आहे.
"नांदगाव तालुक्यात मागील काही वर्षात बोगस डॉक्टरांनी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जाळे पसरले आहे. तालुक्याच्या कार्यक्षेत्रात सुमारे ७४ बोगस डॉक्टर असून ४ बोगस डॉक्टरावर कार्यवाही केली असून उर्वरित तथाकथित डॉक्टरांवर कारवाई करीत तालुक्यातून बोगस डॉक्टरांचे समुळ उच्चाटन करण्यात येईल."
- डॉ. संतोष जगताप, तालुका वैद्यकीय अधिकारी, नांदगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.