Summer Heat : एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून जाणवू लागलेल्या उन्हाच्या झळांचा तडाखा आता बुधवारच्या आठवडे बाजारालाही बसू लागला आहे. मेथी, पालक, कोथिंबीरसारख्या पालेभाज्या दुर्मिळ झाल्या असून, इतर सर्वच प्रकारच्या भाज्यांच्या दरांत तेजी आल्याने त्याचा फटका महिलांच्या बजेटलाही बसला आहे. (Increase in prices of all vegetables including leafy vegetables due to summer nashik news)
गंगाघाटावर दर बुधवारी आठवडे बाजार भरतो. अलीकडे शहराच्या अनेक भागात नियमित भाजी बाजार भरत असला तरी या आठवडे बाजाराचे महत्त्व अद्यापही टिकून आहे. मात्र, मार्चपर्यंत गणेशवाडीतील सप्तशृंग देवी मंदिरापर्यंत पोचणारा बाजारालाही आता उन्हाची झळ पोचली असून तो निम्म्यावर आला आहे.
बाजारात मेथीच्या जुडीसाठी चाळीस ते पन्नास रुपये मोजावे लागत होते, तर छोटी कोथिंबिरीची जुडीही वीस रुपयांवर गेली आहे. याशिवाय किलोभर टोमॅटो, वांगी, ढोबळी मिरची, कारले, भेंडी, हिरव्या मिरच्यांसाठी साठ रुपये मोजावे लागत होते.
फ्लॉवरचा गड्डा वीस रूपयांत तर कोबीचा गड्डा दहा ते पंधरा रूपयांत उपलब्ध होता. चांगल्या दर्जाचे टोमॅटो वीस ते तीस रुपये किलो दराने उपलब्ध होते. कांदे दहा तर बटाटे वीस रुपये किलो याप्रमाणे दर होता.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
लिंबाच्या दरांत मोठी वाढ
वाढत्या उन्हापासून बचावापासून संरक्षण मिळण्यासाठी शीतपेयांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे काही दिवसांपर्यंत दहा रुपयांना तीनचार मिळणारे लिंबाच्या दरांतही दुप्पट वाढ झाली आहे. छोटे लिंबूही आता कमीत कमी पाच रुपयाला उपलब्ध होते.
सायंकाळी चारनंतर गर्दी
आकाशात आग ओकणारा सूर्य व खाली सिमेंटचे रस्ते. यामुळे बाजार भरूनही दुपारी चारपर्यंत विक्रेत्यांना ग्राहकांची प्रतिक्षा होती. चारनंतर खऱ्या अर्थाने बाजारात ग्राहकांची गर्दी होऊ लागली. अंधार पडल्यावर विक्रेत्यांची मिळेल त्या दरांत विक्री सुरू होते, ही संधी साधण्यासाठी रात्री उशिरापर्यंत भाजीपाला खरेदीसाठी महिला वर्गाची गर्दी होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.