Eat Less Salt esakal
नाशिक

Salt Side Effets : मिठाचा खडा खा अन् आरोग्‍य बिघडवा..!

अरुण मलाणी

नाशिक : भाजी असेल किंवा पोळी, त्‍यात मीठ नसले की जेवण बेचव लागते. परंतु काही वर्षांमध्ये आहारात विविध माध्यमातून वाढलेले मिठाचे प्रमाण जिभेचे चोचले पुरवत असले तरी ते आरोग्‍यावर गंभीर परिणाम करत असल्‍याचे समोर येत आहे. ‘मिठाचा खडा, आरोग्‍य बिघडवा...’ अशी स्‍थिती सध्या निर्माण झाली आहे. उच्च रक्‍तदाबासह मूत्रपिंड, यकृतावर मिठाच्या अतिप्रमाणामुळे गंभीर परिणाम होत आहेत. (Increase in serious diseases including high blood pressure due to excess salt intake in diet nashik news)

दैनंदिन आहारात शिजविलेल्‍या अन्नाशिवाय अन्‍य वेगवेगळ्या पदार्थांतून मिठाचे प्रत्‍यक्ष, अप्रत्‍यक्ष सेवन केले जात आहे. विशेषतः लोणचे, पापड, वेफर व अन्‍य चटपटीत पदार्थांमध्ये हे प्रमाण अधिक राहाते. परंतु तज्‍ज्ञांच्‍या सल्‍ल्‍यानुसार आहारात मिठाचे प्रमाण मर्यादित असणे अत्‍यंत आवश्‍यक आहे; अन्‍यथा उच्च रक्‍तदाबाचा त्रास उद्भवू शकतो व दीर्घकाळापर्यंत मिठाचे अतिसेवन मूत्रपिंड, यकृत बाधित करून शरीराची कार्यक्षमता कमी करण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे मिठाचे मर्यादित प्रमाण राखताना संभाव्‍य आजार टाळण्याचा सल्‍लाही दिला जात आहे. मिठाचे शरीरातील दुष्परिणाम कमी करण्यासाठी भरपूर पाणी पिण्यासह व्‍यायाम करण्याचा सल्लाही दिला जात आहे.

सामान्‍यांना सहा ग्रॅमपर्यंत सेवन ठरते योग्‍य

प्रमाणाचा विचार केल्‍यास सर्वसामान्‍य व्यक्‍तीस दिवसातून सहा ग्रॅमपर्यंत मीठ योग्‍य ठरू शकते. तर मूत्रपिंडाचा विकार असलेल्‍या व्‍यक्‍तींसाठी हे प्रमाण निम्‍मे म्‍हणजे तीन ग्रॅमपर्यंत असावे. शक्‍यतो शिजवलेल्‍या पदार्थांत मीठ असावे व वरतून टाकलेले नसावे.

मिठाचे वाढते मार्केट

अगदी २० ते २५ रुपये किलोपासून तर १२५ रुपये किलो दराचे मीठ बाजारपेठेत उपलब्‍ध आहेत. मिठाचे संभाव्‍य धोके लक्षात घेता, पर्यायी मीठ म्‍हणून वेगवेगळी उत्‍पादने बाजारपेठेत उपलब्‍ध आहेत. यामध्ये रॉकसॉल्‍ट, सेंधव मीठ यांसारखे पर्याय नामांकित कंपन्‍यांकडून उपलब्‍ध करून दिले आहेत. सोडियमचे प्रमाण कमी असलेल्या लोना सॉल्‍टची देखील विक्री होत आहे. एकूणच सामान्‍य अशा मिठाचे असामान्‍य आधी मोठी व्‍याप्ती असलेले मार्केट सध्या तयार झाले आहे.

मिठाच्‍या अतिसेवनाने संभाव्‍य व्‍याधी अशा

मिठाच्‍या अतिसेवनाने प्रारंभी उच्च रक्‍तदाबाची तक्रार उद्भवू शकते. पुढे मूत्रपिंडाचे विकार, यकृताचे विकार (लिव्‍हर सिरॉयसिस), मेंदूविकार, पक्षाघात, हृदयरोग, पायाला सूज येणे, जलोधर यांसारखे विकार होऊ शकतात.

यातयामं गतरसं पूति पर्युषितं च यत्।
उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम्।।

आहाराविषयी भगवद्गगीतेतील सतराव्‍या अध्यायातील दहाव्‍या क्रमांकाच्‍या श्‍लोकात वर्णन केले आहे. त्‍यानुसार 'जे जेवण अर्धवट शिजलेले, रस नसलेले, दुर्गंधी असलेले, शिळे, अनुचित, अपवित्र असेल, असे जेवण ते तामस मनुष्याला प्रिय असते, असे संबोधित करताना सात्त्विक जेवणाची सूचना भगवद्‍गीतेत दिली आहे.

"शरीरातील अन्‍य विविध घटकांप्रमाणे संतुलित प्रमाणात क्षारदेखील महत्त्वा‍वाचे असतात. मिठातून सोडियम, पोटॅशियम या प्रमुख घटकाची गरज व्‍यक्तिनिहाय वेगळी असू शकते. आहारात मिठाचा मर्यादित वापर सुदृढ आरोग्‍यासाठी गरजेचा आहे. उच्च रक्‍तदाबापासून पायाला सूज अन्‍य तक्रारी असतील, तर डॉक्‍टरांच्‍या सल्ल्‍यानुसार औषधोपचारासह मिठाचे प्रमाण घटविणे योग्‍य ठरते." -डॉ. शिरीष देशपांडे, फिजिशियन

"मिठाच्या अतिसेवनाने उच्च रक्‍तदाबासारखे आजार उद्भवू शकतात व या माध्यमातून मूत्रपिंडात बिघाड होऊन गंभीर व्‍याधी होण्याचा धोका असतो. मूत्रपिंडाचे आरोग्‍य चांगले राखण्यासाठी सामान्‍यांनी सहा ग्रॅम, आजाराची पार्श्वभूमी असलेल्‍यांनी दैनंदिन तीन ग्रॅमपर्यंत मिठाचे सेवन योग्‍य ठरेल. भरपूर पाणी पिणेही गरजेचे आहे." - डॉ. मोहन पटेल, मूत्रविकारतज्‍ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT