Villagers expressing their joy at the Vanrai dam, which was created through labor donation. esakal
नाशिक

Nashik News : वनराई बंधारेमुळे पाणी पातळीत वाढ! जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी

सकाळ वृत्तसेवा

पेठ (जि. नाशिक) : तालुक्यातील तिळभाट येथे महाराष्ट्र शासन आणि कृषी विभागातंर्गत सरपंच मनोज भोये यांचा पुढाकार आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून बांधण्यात आलेल्या वनराई बंधाऱ्यामुळे जाणाऱ्या पाण्याची अडवणूक होऊन जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यात मदत होत आहे. वाहून जाणारे पाणी अडविले गेल्याने परिसरातील जनावरांचा बारमाही पिण्याचे पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. (Increase in water level due to Vanrai Dam problem of drinking water for animals solved Nashik News)

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

पावसाळ्यात मुबलक पाऊस पडून देखील शिवारातील नदी, नाले कोरडी पडतात तर विहिरींचे पाणी कमी होऊन जाते. परिणामी पाळीव प्राण्यांसह जंगली प्राणी व पशु पक्ष्यांना पुढील आठ महिने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असतो. यावर उपाय म्हणून विभागीय कृषी अधिकारी मोहन वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तिळभाट येथील ग्रामस्थांनी व सरपंच मनोज भोये यांच्यसह गावाच्या नाल्यातून वाहून जाणाऱ्या पाण्याची सिमेंटच्या रिकाम्या गोणीत माती व वाळू भरून नाल्यावर आडवा बंधारा बांधून पाणी अडविले.

ओढ्या मधील वाहते पाणी अडविल्यामुळे या पाण्याचा उपयोग पाळीव प्राण्यांसह जंगली प्राणी व पशु पक्षासाठी तसेच नाल्या जवळील शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी होणार आहे. परिणामी परिसरातील जमिनीच्या पाण्याची पातळीत वाढ होणार असल्याचे पेठ तालुका कृषी अधिकारी अविनाश खैरनार यांनी सांगितले. श्रमदानासाठी सरपंच मनोज भोये, कृषी पर्यवेक्षक प्रदीप कंखर, बाळासाहेब म्हसे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, महिला व तरुण मित्र मंडळ उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT