नाशिक : गत दोन महिन्यांपासून धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे पाटबंधारे खात्याला गंगापूर धरणातून वारंवार पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे. बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधारेनंतर गंगापूर धरणातून पुन्हा मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गोदावरी पुन्हा दुथडी वाहिली. (increase in water level godavari river flood high alert nashik Latest Marathi News)
३० जुलैपासून परिसरात सुरू झालेला पाऊस काही अपवाद वगळता अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे नाशिकची जीवनदायिनी असलेल्या गोदावरीच्या पाणीपातळीतही वारंवार वाढ होत असल्याने काठावरील रहिवाशांसह व्यावसायिकांत महापुराच्या भितीचे वातावरण अद्यापही कायम आहे.
बुधवारी रात्रीपासून गंगापूरच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असल्याने नदीपात्रात पाच हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे पाणी कुंडाबाहेर पसरले. महापालिकेच्या अग्निशामक दलाने नदीकाठच्या नागरिकांसह व्यावसायिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
तसेच पाण्याची पातळी वाढत असल्याने वाहने धुण्यास मज्जाव केला. परंतु वाहन धुणारे संबंधितांचे ऐकत नसल्याने दंडात्मक कारवाईचा इशारा दिल्यावर काही क्षणात ही वाहने तेथून गायब झाली. रात्रभर सुरू असलेल्या पावसाने पाणीपातळीत सकाळीच मोठी वाढ झाली.
त्यामुळे संपूर्ण रामकुंड परिसर पाण्याखाली गेला. रामकुंडावर दशक्रिया विधींसह अन्य श्राद्धाही विधीसाठी वर्षभर गर्दी असते. ज्या ठिकाणी हे विधी होतात, त्या ठिकाणी पाच ते सात फूट पाणी असल्याने आल्याने उंचवट्याच्या ठिकाणी धार्मिक विधी करण्यास पसंती दिली.
वाहतूक कोंडी बनली नित्याचीच
रामकुंड परिसराचे धार्मिक महत्त्व मोठे आहे, याशिवाय समोरच श्री कपालेश्वर महादेव मंदिर आहे. त्यामुळे स्थानिकांसह राज्यातील, परराज्यातील भाविकांची मोठी गर्दी उसळते. सकाळी यात्रेकरूंसह स्थानिकांची वाहने मोठ्या संख्येने रामकुंडावर येत असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होते. त्यातच वस्त्रांतर गृहाजवळ मोठया संख्येने दुचाकी वाहने उभी करण्यात येत असल्याने कोंडीत भर पडते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.