मालेगाव शहर (जि. नाशिक) : राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येते. यासाठी तांदूळ, कडधान्य, मीठ, मसाला, मोहरी- जिरे, हळद आदी वस्तूंचा पुरवठा करण्यात येतो. तर इंधन, भाजीपाला व पूरक आहारासाठी प्रतिविद्यार्थी अनुदान वितरित करण्यात येते.
यासाठी सुधारित अनुदान ९.६ टक्के प्रमाणात वाढ करण्यात आली असून, स्वयंपाकी व मदतनीस यांना मात्र अल्प मानधन दिले जाते.
राज्यभरात दोन लाखांवर स्वयंपाकी व मदतनीस आहेत. मात्र, काम पाहता मानधन अतिशय तोकडे आहे. महागाईचा फटका या योजनेलाही बसत असल्याने अनुदान वाढले. स्वयंपाकी व मदतनीस मानधन वाढीच्या प्रतीक्षेत आहेत. (Increased Nutritional Subsidies Cook Helper Awaiting Salary Hike Nashik News)
केंद्र शासनाने शालेय पोषण आहार योजनेचे नाव बदलून ‘प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजना’ केले आहे. योजनेतून पाहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना खिचडीसह इतर अन्नपदार्थ दिले जातात. आता शासनाने शालेय पोषण आहारासाठीच्या अनुदानाच्या रकमेत वाढ केली आहे. त्यानुसार प्रतिविद्यार्थी प्रतिदिन प्राथमिक वर्गासाठी पाच रुपये ४५ पैसे, तर सहावी ते आठवीच्या वर्गासाठी आठ रुपये १७ पैसे हा सुधारित दर ठरवला आहे.
दरम्यान, वाढत्या महागाईमुळे इंधन आणि भाजीपाल्यासाठी मिळणाऱ्या अनुदानात काही प्रमाणात वाढ केल्याने बचतगट, संबंधित यंत्रणेला व मुख्याध्यापकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शासनाने अन्न शिजविण्याच्या दरात वाढ केली, ही चांगली बाब आहे. परंतु, स्वयंपाकी, मदतनीस तुटपुंज्या मानधनावर काम करत असून, त्यांच्या मानधनात समाधानकारक वाढ करणे आवश्यक आहे. खाद्यतेल, इंधन दरवाढीमुळे योजनेत वेळोवेळी सुधारणा करण्यात येते. मात्र मदतनीस मानधन एक हजार ५०० रुपये चार वर्षांपासून तेवढेच आहे.
हेही वाचा :मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....
मदतनीसांना झाडझूड स्वच्छता, पोषण आहार धान्यादी माल निवडणे, भांडी धुणे, पाणी भरणे, स्टॉक मोजदाद अशा अनेक बाबी कराव्या लागतात. कामाच्या मोबदल्यात महिनाकाठी अतिशय तुटपुंजे मानधन असते. तेही वेळत मिळत नाही.
शालेय वेळ व रोजंदारीवर कामाला जाण्याची वेळ एकच असल्याने इतर कामे न करता एवढ्याच कामाला प्राधान्य द्यावे लागते. किमान पंचवीस दिवस कामाचा मोबदला बघता फक्त साठ रुपये रोजंदारी मिळत असल्याने नाराजीचा सूर व्यक्त होतो. अल्प मानधनही दरमहा वेळेवर मिळत नसल्याने शालेय प्रशासनावर रोष व्यक्त केला जातो.
जिल्ह्यातील शाळा : ४४३९
स्वयंपाकी व मदतनीस संख्या : ८५५१
सुधारित अनुदान (१ ऑक्टोबरपासून)
पहिली ते पाचवी : ५.४५ रुपये
सहावी ते आठवी : ८.१७ रुपये
आहाराचे प्रमाण
पहिले ते पाचवी : ४५० उष्मांक व १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार
सहावी ते आठवी : ७०० उष्मांक व २० ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार
"कौटुंबिक दृष्टीने हाच आर्थिक आधार असल्याने सर्व स्वयंपाकी व मदतनीसांना एवढेच काम करावे लागते. खासगी कामांचे मजुरीचे दर वाढले असताना मानधन वाढवून देण्यात यावे."
- पुष्पा पवार, स्वयंपाकी, जिल्हा परिषद शाळा, महालक्ष्मीनगर (विराणे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.