Palas, Plastic & Thermocol Plates esakal
नाशिक

आरोग्यवर्धक पळसाऐवजी थर्माकोल, प्लॅस्टिकच्या पत्रावळींचा वापर वाढला

प्रमोद सावंत

नरकोळ (जि. नाशिक) : आरोग्यवर्धक व पारंपरिक पळसाच्या (palas) पत्रावळी आता दिसेनाशा झाल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यंत्राच्या सहाय्याने प्लॅस्टिक व थर्माकोल (Plastic & Thermocol) पत्रावळी (Plates), द्रोण (Bowl), ग्लास, चहाकप बनविले जाऊ लागले आहेत. किमतीने कमी वापरण्यास सोयीस्कर असलेल्या या पत्रावळी आता सर्वच कार्यक्रमांत दिसत आहेत. (Increased use of thermocol plastic Plates instead of Palasa leaf plates in Wedding Nashik wedding news)

जेवणासाठी पूर्वी पर्यावरणाचा विचार करून यासाठी लागणाऱ्या पळसाच्या पानांच्या पत्रावळीला अन्यसाधारण महत्त्व होते. या पानात विशिष्ट गुणधर्म (Properties) होते. त्यामुळे या पत्रावळीला मागणी होती. अलीकडच्या काळात वृक्षतोड व हायटेक जीवनपद्धतीमुळे पळसाच्या पानापासून बनविलेल्या पत्रावळीचे प्रमाण कमी झाले आहे. सध्या पळसाच्या पत्रावळी फक्त पितृपंधरवड्यात पूर्वजांना नैवेद्य दाखविण्यासाठी दिसतात. या पत्रावळीऐवजी प्लॅस्टिक व थर्माकोलच्या पत्रावळीचा सर्रासपणे वापर केला जात आहे. पळसाच्या पानांत आयुर्वेदिक गुणधर्म असल्याने अन्नपचन (Useful for digestion) होण्यास मदत होते. पळसाच्या पत्रावळी शिवण्यासाठी लिंबाच्या काडीचा वापर केला जातो. लिंबाच्या झाडालाही आयुर्वेदात महत्त्व आहे. शिवाय, पळसाच्या पानांना कीडही लागत नाही. या पत्रावळी पूर्वी सहज उपलब्ध होत. मात्र, स्वस्त व आयुर्वेदीय महत्त्व असलेल्या पळसाच्या पानांच्या पत्रावळी आता हद्दपार झाल्या आहेत.

पत्रावळीचे दर :

सिल्व्हर कोटिंग ४० पत्रावळींचा गट्टा- ५० रुपये

कागदी उच्च दर्जाची- ७० ते ८० रुपये

द्रोण, पन्नास नग मोठे- ५० ते ५५ रुपये

छोटे द्रोण- ३० रुपये

चिवडा प्लेट, ५० नग- ३० ते ३५ रुपये

ग्लास- ५० नग- ४० ते ५० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

Latest Marathi News Updates : अजित पवार यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांच्या देवगिरी बंगल्यावर फेऱ्या

SCROLL FOR NEXT