नाशिक : गेल्या आठवडाभरापासून शहरात चोऱ्या-घरफोड्यांचे सत्र सुरू असून, यामुळे नागरिकांमध्ये कमालीचे भितीचे वातावरण आहे. घराला कुलूप दिसले की त्याठिकाणी घरफोडी झालीच समजा, असाच प्रकार सध्या शहरात सुरू आहे. शहरातील आडगाव, अंबड, सातपूर आणि देवळाली कॅम्प या परिसरात चोरट्यांनी घरफोड्यातून ११ लाखांचा मुद्देमाल तर, भद्रकाली व मुंबई नाका परिसरात चोरीच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, पोलिस ठाणेनिहाय रात्रीची नाकाबंदी सुरू असतानाही घरफोडीच्या घटना घडत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (increasing burglary cases in Nashik Crime News)
कृष्ण बाळासाहेब सानप (रा. सुदर्शन अपार्टमेंट, अमृतधाम) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या सोमवारी (ता. १९) रोजी त्यांचे घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी सकाळी साडेनऊ ते दुपारी दोन वाजेच्या दरम्यान, बंद दाराचा कडी कोयंडा तोडला. चोरट्यांनी घरातून १३ हजारांची रोकड व दोन मोबाईल, ट्रीमर, ब्लुटुथ, हेडफोन, हेल्मेट असा २२ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
याप्रकरणी आडगाव पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक जाधव हे तपास करीत आहेत. त्रिमूर्ती चौकातील शाहुनगरमध्ये घरफोडी झाली. राजेश प्रभाकर कामळे (रा. यमुनानगर, शाहुनगर, त्रिमूर्ती चौक, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या सोमवारी (ता. १९) सकाळी साडेदहा ते दुपारी पावणे दोन यावेळेत त्यांच्या घराला कुलूप होते. चोरट्यांनी संधी साधून दाराचे कुलूप तोडून बेडरुममधील कपाटातील ६३ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. यात सोन्याची चैन, वेल, चांदीचे क्वाईन व ३० हजारांची रोकड असा ऐवज होता.
याप्रकरणी अंबड पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. तिसर्या घरफोडीत संशयितांनी १० लाखांचे संसारोपयोगी वस्तू चोरून नेल्याचा प्रकार पिंपळगाव बहुला येथे घडला. कुणिका राजेश पाटील (रा. विनय अपार्टमेंट, थत्तेनगर, कॉलेजरोड) यांच्या फिर्यांदीनुसार संशयित संजय प्रभाकर गणोरकर (६०, रा. गायकवाडनगर, मुंबई नाका) व इतरांनी त्यांच्या पिंपळगाव बहुला येथील बंद घराचे कुलूप तोडले आणि घरातून दागिने, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन, फर्निचर, बेड, कपे, किचन ट्रॉली यासह संसारोपयोगी साहित्य असा १० लाखांच्या वस्तू चोरून नेल्या.
याप्रकरणी सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर देवळाली कॅम्प परिसरातही मोबाईल दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी १८२३५ रुपयांचे मोबाईल चोरून नेले. अवैश रउफ खान (रा. भगूर) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या सोमवारी (ता. १९) अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद दुकानाच्या शटरचे कुलूप कापून चोरी केली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घासबाजारातून बकऱ्या- बोकड चोरून नेले
साईम मोहम्मद शफी कोकणी (रा. दादासाहेब फाळके रोड, जुने नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या गुरुवारी (ता. २२) दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास होंडा एसेंट कारमधून (एमए
हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?च १४ डीएक्स ४८०८) दोघे संशयित आले आणि मौलाबाबा जीमजवळून त्यांनी ५० हजार रुपयांच्या दोन बकर्या व दोन बोकड कारमध्ये टाकून चोरून नेल्या. याप्रकरणी भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच, चांडक सर्कल येथील बंगल्याच्या आवारातील चंदणाचे झाड तोडून नेल्याचा प्रकार घडला. विलास निवृत्ती कदम (रा. शिंदे) यांच्या फिर्यादीनुसार, राजगृह बंगल्याच्या आवारातील ५ हजार रुपयांचे चंदणाचे झाडाचा बुंधा अज्ञात संशयितांनी गेल्या गुरुवारी (ता. २२) मध्यरात्री तोडून नेला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
४ घरफोड्या : ११ लाख ३ हजार ५३५ रुपयांचा ऐवज
२ चोऱ्या : ५५ हजार रुपयांचा ऐवज
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.