Nashik Crime News : शासकीय नोकरीला असल्याचे भासवून इतरांना नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत पैसे उकळणारा तरुण कर्जबाजारी झाल्याने त्याने लॉजमध्ये गळफास घेत आत्महत्या केली.
शुभम प्रल्हाद गोळे (वय २३, रा. निफाड, जि. नाशिक) असे मृत तरुणाचे नाव आहे.(Indebted youth commits suicide in lodge nashik crime news)
सीबीएसजवळील पद्मालक्ष्मी हॉटेलमध्ये शुभम गोळे याने रूम भाड्याने घेतली होती. गुरुवारी (ता. ३) सायंकाळी सहा वाजता चेकआउट करणार असल्याने हॉटेलचे कर्मचारी हर्षल राव हे त्याला बोलाविण्यास गेले.
त्याचवेळी त्याने रुममध्ये स्कार्फच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. घटनेची माहिती सरकारवाडा पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय चाचणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला.
यानंतर पोलिसांनी तपास केला असता, शुभमचे वडील खासगी ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहेत. शुभम हा रेल्वेत नोकरीला आहे असे सांगत होता. त्यासाठी त्याने बनावट ओळखपत्रही बनविले होते.
कार्यरत असल्याचे सांगून त्याने नातेवाइकांसह अनेकांना नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. त्यामुळे त्याने अनेकांकडून लाखो रुपये घेतले.
हे पैसे त्याने कुठे खर्च केले हे समोर आले नसून, सध्या पैसे संपल्याने व ज्या लोकांनी पैसे दिले आहेत, ते नोकरी किंवा पैसे मागत असल्याने तो तणावात होता. या कोंडीतून त्याने जीवनयात्रा संपविली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.