Indian & Pakistan Onion  esakal
नाशिक

Onion Rates Hike: मलेशियामध्ये भारतीय कांद्यापुढे पाकच्या कांद्याची शिजेना डाळ!

महेंद्र महाजन

Onion Rates Hike : मलेशियाच्या बाजारपेठेमध्ये पाकिस्तानच्या कांद्याची भारतीय कांद्यापुढे डाळ शिजेनाशी झाली आहे. भारतीय कांद्याच्या तुलनेत पाकिस्तानच्या कांद्याचा टनाचा भाव ५ ते १० डॉलरनी अधिक आहे. त्याचवेळी पाकिस्तानच्या कांद्याची साल तग धरत नसल्याचे आयातदारांच्या निदर्शनास आले आहे.

एवढेच नव्हे, तर भारतीय कांद्याच्या भावात आणखी ३ रुपयांची वृद्धी झाली, तरीही पाकिस्तानचा कांदा मोठ्याप्रमाणात आयात करण्यास व्यापारी उत्सुक नसल्याचे मलेशियात पोचलेल्या भारतीय निर्यातदारांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले. (Indian exporters arrived in Malaysia traders are not keen to import Pakistani onion in large quantities nashik news)

भारतीय निर्यातदारांनी मलेशियात व्यापारानिमित्त गेल्यावर भारतीय आणि पाकिस्तानच्या कांद्याला मिळणाऱ्या प्रतिसादाची माहिती जाणून घेतली. पाकिस्तानमधील व्यापारी निर्यातीच्या कांद्यात मोठ्या आकारासोबत छोट्या आकाराचे कांदे पाठवत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली आहे.

मलेशियामध्ये भारतीय कांदा टनाला २३० ते २३५ डॉलर भावाने दिला जात आहे. त्याचवेळी पाकिस्तानचा कांदा टनाला २४० ते २५० डॉलर भावाने आयातदारांना विकत घ्यावा लागत आहे. दरम्यान, आखाती देशांमध्ये पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील नवीन कांद्याने ३० टक्के बाजारपेठेतील हिस्सा मिळवला आहे.

मात्र बांगलादेशच्या जोडीला ‘नाफेड’ ने कांदा खरेदी सुरु केल्याने भारतीय कांद्याला बाजारपेठेची चिंता उरलेली नसल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे. याखेरीज भारतीय कांद्याचा टनाला सिंगापूरसाठी २६५, श्रीलंकेसाठी २६०, दुबईमध्ये २६० ते २६५, आयाती देशामध्ये २५० ते २७० डॉलर असा भाव आहे.

पिंपळगावमध्ये ७ जूनचा आज भाव

कांद्याचे आगार असलेल्या पिंपळगाव बाजार समितीत ७ जूनला क्विंटलला सरासरी १ हजार ५० रुपये भाव मिळाला होता. तोच भाव आज शेतकऱ्यांना मिळाला. ६ जूनला उन्हाळी कांदा क्विंटलला सरासरी अकराशे रुपयांपर्यंत पोचला होता.

८ जूनपासून मात्र भावात घसरणीला सुरवात झाली आणि क्विंटलचा सरासरी भाव ९०१ रुपये निघाला. ९ जूनला ९००, तर शनिवारी (ता. १०) ९५० रुपये क्विंटल असा सरासरी भाव राहिला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कांद्याच्या बाजारभावाची स्थिती (आकडे क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये दर्शवितात)

बाजारपेठ सोमवार (ता. १२) शनिवार (ता. १०)

कोल्हापूर ९०० १०००

मुंबई ९०० १०००

सातारा १००० १०००

येवला ७५० ८००

लासलगाव ९०० ९३०

मनमाड ७५० ७५०

वैजापूर ८०० ८००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambegaon Shirur Assembly election : दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात उमेदवार कोण?

Latest Maharashtra News Updates : कोल्हापूरला परतीच्या पावसाने झोडपले

IND vs NZ 1st Test : नशीबानं थट्टा अशी मांडली...! Rohit Sharma ची विचित्र विकेट पडली, कॅप्टनलाही विश्वास बसेना

Diwali Dos and Don'ts: दिवाळीला कोणत्या गोष्टी कराव्या अन् कोणत्या नाही, वाचा एका क्लिकवर

Manini De : छोट्या पडद्यावर परतणार मानिनी डे; झी टीव्हीवरील मालिकेत साकारणार 'ही' महत्वाची भूमिका

SCROLL FOR NEXT