Mobile Diesel Pump started at umrane Nashik News esakal
नाशिक

उमराणेत आता फोन केल्यास जागेवर मिळेल डिझेल | Nashik

सकाळ वृत्तसेवा

द्वारका (जि. नाशिक) : काळानुरूप बदलांचा वेध घेत सेवा अधिकाधिक ग्राहकाभिमुख करण्याच्या हेतूने इंडियन ऑइलने (Indian Oil) एक पाऊल पुढे टाकले आहे. शेती आणि वस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांना डिझेल (Diesel) घेण्यासाठी लागणारा वेळ आणि पैसा वाचावा, यासाठी थेट त्यांच्या बांधावर डिझेलचा पुरवठा सुरू केला आहे. याअंतर्गत उत्तर महाराष्ट्रातील पहिला मोबाईल डिझेल पंप (Mobile Diesel Pump) उमराणे (ता. देवळा) येथील मे. देवरे पेट्रोलियमला परवानगी दिली असून, इंडियन ऑइलच्या निकषानुसार त्यांनी डिझेल टॅंकरवर तयार केलेला हा पंप थेट शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्यांच्या बांधावर डिझेलचा पुरवठा करीत आहे. इंडियन ऑइलच्या या उपक्रमाचे शेतकऱ्यांनी जोरदार स्वागत केले असून, आपला वेळ आणि पैसा वाचून जागेवरच डिझेल मिळत असल्याने कृषिकामांची गती वाढल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

सौंदाणे (ता. मालेगाव) येथील आग्रा रोडवरील मे. देवरे पेट्रोलियमपंपाचे संचालक डॉ. लक्ष्मण शंकर देवरे यांनी इंडियन ऑइलच्या धोरणानुसार ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जागेवर डिझेल उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. इंडियन ऑइल कंपनीच्या बाराचाकी डिझेल टॅंकरवरच हा पंप बसविण्यात आला आहे. आधी डिझेलसाठी पंपावर येणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाहनांना आता पंपावर येण्याऐवजी हा डिझेल पंप असलेला टँकरच शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांना डिझेल पुरवीत आहे. ‘शेतकऱ्यांनी गरजेनुसार फोन करावा, त्यांना जागेवर डिझेल उपलब्ध करून देण्याचा प्रारंभ रविवारपासून (ता. १०) करण्यात आला.

जिल्ह्यातील मोबाईल डिझेल पपाचा हा पहिलाच टँकर इंडियन ऑइल कंपनीने खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिला असून, या डिझेलपंपामुळे शेतकरी खुश झाले आहेत. डिझेलच्या दररोजच्या वाढत्या किमतीमुळे बेजार झालेल्या शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोहोंची यामुळे बचत होत आहे. शेतकऱ्यांनी यासाठी मोठा प्रतिसादही दिला आहे. या आगळ्या उपक्रमाबद्दल शेतकऱ्यांनी इंडियन ऑइलला धन्यवाद दिले आहेत.

...या गावाच्या शेतकऱ्यांचा फायदा

सौंदाणे येथे डॉ. देवरे यांचा १४ वर्षीपासून हायवेलगत देवरे पेट्रोलपंप आहे. उमराणे, सौंदाणे परिसरातील डोंगरगाव, तिसगाव, चिंचावड, नांदगाव, झाडी, एरंडगाव, वऱ्हाळे, मांजरे, सोनज, मेशी आदी बारागावांतील शेतकऱ्यांचा यामुळे मोठा फायदा झाला आहे. या गावांचे अंतर उमराणे व सौंदाणे येथून दहा ते बारा किलोमीटर आहे. येथील शेतकऱ्यांना चारचाकी वाहने, ट्रॅक्टर आदी शेतीपयोगी यंत्रांना डिझेलसाठी उमराणे किंवा सौंदाणे येथील डिझेल पंपावर दररोजच जावे लागत होते, तो ताण यामुळे वाचला आहे.

मागणीनंतर अर्ध्या तासात पुरवठा

श्रीराम नवमीच्या मुहूर्तावर डोंगरगाव येथील कीर्तनकार बापू महाराज आळंदीकर यांच्या हस्ते व डोंगरगावचे सरपंच दयाराम सावंत यांच्या उपस्थितीत या फिरत्या डिझेलपंपाचे उद्‍घाटन झाले. ‘पिवर भी और पुरा भी’, माप चेक करून घेणे हा ग्राहकाचा हक्क आहे. ‘मापात पाप नाही’ हे या फिरत्या डिझेल पंपाचे ब्रीदवाक्य आहे. खास शेतकऱ्यांपर्यंत डिझेल शेतात जागेवर वेळेवर पोच करणे, शेतकरी वाहनधारकांसाठी बांधावर डिझेलसारखी सुविधा व्हावी म्हणून हा पंप इंडियन ऑइलच्या निर्देशानुसार सुरू केला आहे. ग्राहकांना अर्ध्या तासात जागेवर डिझेल उपलब्ध करून दिले जाते. शेतातील विहिरीवरील डिझेल इंजिन व जनरेटरसाठी जागेवर डिझेल उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. विशेष म्हणजे डिझेलचा दर नियमित आहे तोच राहील. बांधावर पोचसाठी कुठलाही जादा आकार घेतला जाणार नाही, असेश्री. देवरे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

"ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीपयोगी कामांसाठी लागणाऱ्या डिझेलच्या खरेदीसाठी पाच ते दहा किलोमीटरवरील पंपावर यावे लागते. त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचावा, या हेतूने इंडियन ऑइलने ग्राहकाभिमुख उपक्रमांतर्गत मोबाईल डिझेलपंप ही संकल्पना आणली आहे. या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. उत्तर महाराष्ट्रातील सौंदाणे येथील हा पहिलाच प्रयत्न आहे. शेतकरी ग्राहकांचा वेळ यामुळे वाचून त्याच्या कृषिकामांना अधिक गती मिळू शकेल. त्यांची होणारी गैरसोय यामुळे टळणार आहे. इंडियन ऑइलने ग्राहकांना अधिकाधिक जलदगतीने सेवा देण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे."

- अंजली भावे, जनरल मॅनेजर, कॉर्पोरेट कम्युनिकेशन, इंडियन ऑइल, मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT