A cable wrapped around a lamp post. esakal
नाशिक

Nashik News : इंदिरानगरच्या पथदीपांवर केबलचा कब्जा!

सकाळ वृत्तसेवा

इंदिरानगर (जि. नाशिक) : शिवाजीवाडी ते थेट पाथर्डी गावापर्यंत असलेल्या वडाळा -पाथर्डी रस्त्यावर केबल आणि इंटरनेट चालकांच्या केबल्सने अतिक्रमण केल्याने वाहतूक समस्या निर्माण झाल्याने याबाबत संबंधित यंत्रणेने लक्ष घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. केबलवाल्यांकडून टीव्ही तसेच इंटरनेटच्या सुविधांसाठी या केबलचा वापर केला जातो. (Indiranagar street lights occupied by cables Nashik News)

सहसा इमारतींच्या टेरेसवर या संबंधित यंत्रणा बसवलेल्या आहेत. तेथून जोडणी देताना मोठ्या लांबीच्या केबलचा वापर केला जातो. त्यासाठी वेळप्रसंगी हा मुख्य रस्तादेखील ओलांडावा लागतो. त्यामुळे रस्त्याच्या दुभाजकात असलेल्या पथदीपांचा उपयोग उपयोग ही मंडळी करते.

मात्र असे करत असताना बहुतांश वेळा कोणतीही खबरदारी न घेतल्याने या केबल खाली लोंबकळतात. त्यामुळे आता ठिकठिकाणी अपघातांच्या मालिका सुरू झाल्या आहेत. मंगळवारी (ता.३१) सायंकाळी विनयनगर भागात दुचाकीवरील महिलेच्या हॅण्डलमध्ये केबल अडकल्याने अपघात झाला.

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

यापूर्वी देखील एका कारचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरातील युवकांना अनेक वेळा रस्त्यावर पडलेली ही केबल गोळा करून पथदीपाला बांधून ठेवावी लागते. या केबलमुळे शॉर्टसर्किट सारखे प्रकारदेखील होत असून त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे .त्यामुळे संबंधित यंत्रणांनी याबाबत लक्ष घालण्याची मागणी आता नागरिकांनी केली आहे.

"सध्या टीव्ही आणि इंटरनेटच्या वीज खांबावर टाकलेल्या या केबलमुळे वारंवार अपघात होत आहेत. अनेक वेळा संबंधितांना सांगूनदेखील कोणत्याही प्रकारची सुधारणा दिसून येत नाही. संबंधित यंत्रणेने दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे."

- प्रवीण जाधव, सामाजिक कार्यकर्ता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT