Stop Flu esakal
नाशिक

Flu Treatment : फ्लू पासून दूर राहायचंय? मग जाणून घ्या हे उपचार

सकाळ वृत्तसेवा

"हवेच्या तापमानातील सातत्याने होणारा बदल, अवेळी पाऊस, या सर्व गोष्टींचा खचितच सर्वांच्याच आरोग्यावर परिणाम दिसून येतोय. त्यातल्या त्यात जेव्हा घरातील लहान मुलं आजारी होते. तेव्हा मात्र कुणाचेच चित्त थाऱ्यावर राहात नाही. फ्लू म्हणजे इन्फारंझा विषाणू व त्यासदृश्‍य विषाणूंमुळे होणारे आजाराचे प्रमाण खूप वाढलेले दिसून येत आहे. Seasunal Flu चे प्रमाण जानेवारी ते मार्च व नंतर ऑगस्ट ते ऑक्टोबर मध्ये जास्त असते. Influenza विषाणूचे A, B, C असे तीन प्रकार आहेत. TYPCA मध्ये Hemoglutinia (H), Neuramizadaue (N) असे सबटाईप आहेत. H1N1, H2 N2, H3 N3, H5 N1, H1N2, H5N3 असे अनेक प्रकारचे इन्फेक्शन आढळून येत आहेत." - डॉ. दीपा दिनेश जोशी, बालरोगतज्ज्ञ व नवजात शिशू तज्ज्ञ

(Infaranza virus Flu treatment nashik health news)

फ्लू सदृश रुग्णाची लक्षणे

- ताप

- घसादुखी, घशाला खवखव

- खोकला, नाक गळणे

- अंग दुखी, डोके दुखी

- अशक्तपणा

- काही रुग्णांमध्ये जुलाब व उलट्या व त्यामुळे निर्जलीकरण

फ्लू आजाराचे लक्षणांप्रमाणे वर्गीकरण

१) सौम्य आजार- तापाची तीव्रता कमी, घसा खवखव, अंगदुखी, डोकेदुखी

२) तीव्र आजार- खूप तीव्र ताप, (३८ अंशपेक्षा जास्त)

- तीव्र घसादुखी

- घशाला सूज येणे

- जुलाब, उलट्या

- अशक्तपणा

३) अतितीव्र आजार : वरील लक्षणांशिवाय

- छातीत दुखणे

- दम लागणे

- खोकल्यातून रक्त येणे

- रक्तदाब कमी होणे

- नखे निळी, काळसर पडणे

- अतिसुस्तपणा

- खाण्यास नकार, सातत्याने उलट्या

लहान मुलांमध्ये तापाचे प्रमाण खूपच वाढले आहे. मुलांमधील ताप काळजी करायला लावणारा असतो. परंतु, पालकांनी व्यवस्थित काळजी घेतल्यास उपचार करणे सोपे होते.

पालकांनो मुलांना ताप येत असल्यास काय काळजी घ्यावी. ?

- घरात तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर आवश्‍यक

- तापाची नोंद ठेवा

- ताप किती तासात येतो, किती वेळात उतरतो तापाबरोबर इतर काही लक्षणे आहेत का याची नोंद ठेवावी.

लहान मूल तापात हसत खेळत असेल, व्यवस्थित खात-पीत असेल, ताप उतरल्यावर अगदी उत्साही असेल तर गंभीर आजार नाही.

- डॉक्टरांच्या सल्ल्याने पॅरासिटमॉल औषध देण्यास हरकत नाही.

- भरपूर पाणी, फळांचा रस, जलजीवन सकसआहार द्यावा.

- ताप हा आजार नसून तो एक किंवा अधिक रोगाचे लक्षण आहे. ताप येणे म्हणजे शरीराने आजाराविरुद्ध दिलेली प्रतिक्रिया आहे.

ताप कमी करण्यासाठी हे करा-

- खुल्या हवेचा वापर

- कपडे ढिले करून मोकळे करा

- शरीर ओल्या कपड्याने पुसून घ्या.

- डॉक्टरांच्या सल्ल्याने तापाचे औषध द्या.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

हे करू नका

- बाळाला स्वेटर, चादर, रगमध्ये गुंडाळू नये.

- थंड पाण्याने अंघोळ घालू नये.

- खूप तीव्र अशी तापाची औषधे वापरू नये. त्यामुळे शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात.

- विषाणूजन्य आजार ३ ते ६ दिवसात बरे होतात. आपल्या मनाने प्रतिजैविक सुरू करू नका.

फ्लू आजार टाळण्यासाठी काय करावे?

- हात साबणाने स्वच्छ धुणे.

- पौष्टिक आहार देणे.

- लिंबू, आवळा, संत्री, हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात समावेश करावा.

- मुलांना भरपूर पाणी पिण्यास सांगावे.

-पुरेशी झोप व विश्रांती

- गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांना नेणे टाळावे.

- डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध द्यावीत.

- फ्लू आजारासाठी उपलब्ध असलेली लस मुलांना द्यावी.

शाळा व शैक्षणिक संस्थांसाठी सूचना

- सर्व वर्ग शिक्षकांनी कोणा विद्यार्थ्याला फ्लूची लक्षणे असल्यास त्याची पाहणी करावी. असा विद्यार्थी आढळल्यास वैद्यकीय विभागाकडे पाठवावे व ७ दिवस घरी राहण्याचा सल्ला द्यावा. पालकांनी घरी मुलांच्या प्रकृतीकडे बारकाईने लक्ष द्यावे व डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: चंदगड मतदारसंघात शिवाजी पाटीलआघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT