Educational material esakal
नाशिक

शिक्षणावरही महागाईचा भार; शैक्षणिक साहित्य दरात 20 ते 30 टक्के वाढ

खंडू मोरे

खामखेडा (जि. नाशिक) : नवीन शैक्षणिक सत्र (New Academic session) तोंडावर आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची आठवडाभरात विविध शैक्षणिक साहित्य (Eduactional Material) खरेदी करण्याची लगबग सुरू होणार आहे. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी शैक्षणिक साहित्यात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे पालकांचे बजेट बिघडणार आहे. (Inflation on education 20 to 30 percent increase in educational materials Nashik News)

२०२०-२१ आणि २०२१-२२ या दोन वर्षांत कोरोना संक्रमण आणि लॉकडाउनमुळे शाळा, महाविद्यालये बंद होती. या काळात ऑनलाईन शिक्षण सुरू होते. यामुळे मुले शाळेत न गेल्याने पालकांना फारसे शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची वेळ आली नाही. शिवाय या दोन्ही वर्षांत शैक्षणिक साहित्याचे दर आजच्या दराच्या तुलनेत कमी होते. जानेवारी २०२२ पासून शाळा व महाविद्यालये पूर्ववत पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहेत. हीच परिस्थिती येत्या शैक्षणिक सत्रात राहणार असल्याने पालकांना त्यांच्या पाल्यांसाठी स्कूल बॅगपासून वह्या, पेन, वॉटर बॉटलपर्यंत बहुतांश साहित्य नवीन खरेदी करावे लागणार आहे. मुलांचे शिक्षण महत्त्वाचे असल्याने शैक्षणिक साहित्याचे दर वाढले असले, तरी नाइलाजाने का होईना शैक्षणिक साहित्य खरेदी करावेच लागणार असल्याचेही पालकांनी सांगितले.

वाहतूक आणि जीएसटीत वाढ

मागील वर्षी शैक्षणिक साहित्यावरील जीएसटी १२ टक्क्यांवरून १६ टक्के करण्यात आला आहे. त्यात कागदाचे दरांसह वाहतूक खर्च वाढला आहे. सोबतच मजुरी, हमाली, वाहतूक व इतर खर्च वाढल्याने शैक्षणिक साहित्याचे दर वाढले आहेत.

५० ते ८० रुपये प्रतिडझन वह्यांच्या किमतीत वाढ

मागील वर्षी १०० पेजेसच्या वह्यांचे दर प्रतिडझन २०० ते २२० रुपये होते. ते या वर्षी ३०० रुपये, २०० पेजेस वह्यांचे दर प्रतिडझन ३५० रुपयांवरून ४०० रुपये प्रतिडझन झाले आहेत. मागील वर्षी १० नग पेनासाठी ३५ रुपये द्यावे लागायचे. या वर्षी १० रुपये अधिक म्हणजेच ४५ रुपये जास्तीचे द्यावे लागत आहेत. स्कूलबॅग, वॉटर बॉटल, शूज, गणवेश व इतर साहित्याचे दर किमान ३० टक्क्यांनी वाढले आहेत. प्रत्येक वस्तूच्या किमतीत वाढ होत आहे. उत्पन्न मात्र पूर्वी एवढेच आहे. उत्पन्नाचे नवीन साधनही मिळत नाही. त्यामुळे शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी अधिक पैसा मोजावा लागणार आहे.

एका विद्यार्थ्यावर होणारा खर्च

-१०० पेजेस वही :३००

-दोनशे पेजेस वही : ८००

-स्कूलबॅग : ४००

-वॉटर बॉटल : १४०

-शूज : ४००

-गणवेश : ४०० ते ६००

-इतर खर्च : ३००

एकूण खर्च : दोन ते अडीच हजार

"कच्च्या मालापासून, तर जीएसटी आणि वाहतूक भाड्यात वाढ झाल्याने शैक्षणिक साहित्याचे दर वाढले आहेत. वह्यांचे दर १५ ते २० टक्के, पेन दोन ते चार रुपये आणि स्कूल बॅगचे दर २० टक्क्यांनी वाढले आहेत." - विलास शिरवाडकर, पुस्तक विक्रेते, देवळा

"मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी शैक्षणिक साहित्याचे दर वाढल्याने आर्थिक भार वाढला आहे. दरवाढीमुळे खर्चाचे वार्षिक नियोजन बिघडले आहे." - रवींद्र शेवाळे, पालक, खामखेडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : संविधानावर बोलताना राहुल गांधींचा माईक झाला बंद, सुरु होताच म्हणाले, कितीही प्रयत्न करा, पण...

Potato : सर्वांच्या लाडक्या बटाट्याचा जन्म भारतातला नाहीच ! बटाट्याच्या भाजीच्या अनेक पद्धती काय ? जाणून घ्या आरोग्याचे फायदे

Pan Card Update : महत्त्वाची बातमी! बंद होणार जुने पॅनकार्ड, जाणून घ्या नव्या पॅन कार्डसाठी किती खर्च येईल

Farmers Income: शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची नवी योजना; शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 20,000 रुपये

IPL Auction: १३ वर्षीय Vaibhav Suryavanshi साठी राजस्थानने का मोजले १ कोटी! द्रविडने सांगितलं कारण; वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT