ingredient of Shirkhurma Sutarfeni most wanted in Malegaon esakal
नाशिक

Ramzan | शिरखुर्माचा गोडवा वाढविणाऱ्या सुत्तरफेनीची मालेगावात हवा

जलील शेख

मालेगाव (जि. नाशिक) : रमजान ईदच्या शिरखुर्म्याला लागणारे साहित्य येथील बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहे. काजू, बदाम, किसमिस, खोबरे, तुररी विक्रीसाठी असले तरी शिरखुर्माचा (Sheer Khurma) गोडवा वाढविणारी सुतरफेणीचीच मालेगावात हवा आहे. गरीब-श्रीमंत अशा सर्वच कुटुंबात आवडीने सुतरफेणी खाल्ली जाते. येथे सुतरफेणी बनविण्याची लगबग सुरू आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तूप, मैदा, सिलिंडरचे भाव वाढल्याने सुतरफेणीचा गोडवा महागणार आहे.

रमजान ईदला (Ramzan Eid) मुस्लिम बांधव घराघरांत शिरखुर्मा करतात. दिवाळीच्या फराळाबरोबरच शिरखुर्म्याचा स्वाद चाखण्यासाठी हिंदू-मुस्लिम (Hindu Muslim) बांधव एकत्र येत असल्याने दिवाळी (Diwali) व रमजान हे दोन्ही सण येथील राष्ट्रीय एकात्मतेला बळकटी देत आहेत. शिरखुर्म्यासाठी सुतरफेणी लागते. शहरात नुमानीनगर, रौनकाबाद, मोहम्मद अलीरोड, आयशानगर, गवळीवाडा, रमजानपुरा, विजय नगर, नयापुरा आदी २० पेक्षा अधिक ठिकाणी सुतरफेणी केली जाते. शहरात मोहम्मद अलीरोड, किदवाई रोड, सरदार मार्केट, कुसुबा रोड,पवार वाडी, रमजान पुरा, देवीचा मळा,आझाद नगर, चंदपुरीगेट आदी ठिकाणी सुतरफेणी विक्रीची दुकाने आहेत.

मालेगावच्या सुतरफेणीला सर्वत्र पसंती

सुतरफेणी तयार करणाऱ्या शेकडो कारागिरांना रोजगार मिळाला आहे. पाचव्या उपवासापासून सुतरफेणी तयार केली जाते. रमजान ईदच्या एक दिवस अगोदर (चॉंद रात) सर्वाधिक सुतरफेणीची विक्री होते. काही कुटुंबीयांनी खरेदीला सुरवात केली आहे. बाहेरगावाहून कपडे खरेदीसाठी आलेले नागरिक हमखास सुतरफेणीची खरेदी करतात. शहरातून नाशिक, जळगाव, पुणे, नगर, खंडवा, खरगोन, सेंधवा, कन्नड, सिल्लोड, औरंगाबाद, जालना, परभणी आदी ठिकाणी सुतरफेणी विक्रीसाठी पाठविली जाते. संबंधित घाऊक व्यापाऱ्यांनी मालाची आगाऊ बुकिंग केली आहे. खानदेशमध्ये मालेगावपाठोपाठ धुळे येथेही सुतरफेणी तयार केली जाते. मालेगावच्या सुतरफेणीला सर्वत्र पसंती आहे.

असा करता सुतरफेणीचा वापर

रमजान ईदला घराघरांत शिरखुर्मा बनविला जातो. शिरखुर्म्यामध्ये सुतरफेणीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. सुतरफेणीमुळे शिरखुर्मा चविष्ट होतो. काही नागरिक फक्त दुधाबरोबर सुतरफेणी खातात. मुस्लिम-हिंदू या दोन्ही समाज बांधवांकडून सुतरफेणलीा पसंती मिळते. कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने येथील रगेबेरंगी सुतरफेणी महाग झाली आहे. गेल्या वर्षी तुपाच्या १५ किलो डब्याचे भाव १४०० रुपये होते. सध्या २५०० रुपये झाले आहे. त्यामुळे १२० रुपयाला मिळणारी सुतरफेणी १६० रुपये किलोप्रमाणे विक्री होत असल्याचे फाइव्ह स्टारचे संचालक अब्दुल रहमान यांनी सांगितले.

असा आहे दर (किलोमध्ये)

सफेद सुतरफेणी -- १५० ते १६०

पिवळी सुतरफेणी -- १६० ते १७०

हिरवी सुतरफेणी --- १५० ते १६०

ऑरेंज सुतरफेणी --- १५० ते १६०

चुंबळी सुतरफेणी --- १३० ते १४०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live: वडगाव शेरी मतदारसंघात तुतारी वाजली; बापू पठारेंचा 5000 मतांनी विजयी

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे यांच्या पराभवाची ५ कारणं; दोघांचं भांडण, महेश सावंतांचा लाभ

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: एकनाथ शिंदेंनी शब्द खरा करून दाखवला, विधानसभेतील 'ते' भाषण व्हायरल

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: माळशिरसात सातपुते २०७५ मतांनी पिछाडीवर

SCROLL FOR NEXT