निफाड : तालुक्यातील देवगाव पंचकेश्वर शिवारात शेतकऱ्यांना जखमी कॉमन क्रेन आढळला. शेतकऱ्यांनी निफाडच्या पक्षी मित्रांना याबाबत माहिती दिली.
जखमी क्रेनला उपचारासाठी नाशिकला पाठविण्यात आल्याची माहिती पक्षीमित्र डॉ. उत्तमराव डेर्ले यांनी दिली. (Injured common crane bird found in Devgaon Panchkeshwar Shivara Nashik News)
कॉमन क्रेन पक्षी स्थानिक व स्थलांतरित आहे. साधारणपणे त्यांची उंची ५ ते ६ फूट असते. त्याचे पंख ३ ते ४ किलो वजनाचे असतात. तो थव्याने व्ही आकारात आकाशात उडणारा पक्षी आहे. त्याची टोकदार लांब चोच असते.
डोक्यावर लालसर भाग असतो. ग्रे रंगाची शेपूट व पंख झुपकेदार असतात. काळी रांगाीच लांब मान असते. आशिया, उत्तर अमेरिका. अफ्रिका, युरोपमध्ये हा पक्षी आढळतो. पाणथळ, गवताळ, दलदलीचा वा शेतात प्रजनन करतो.
मनमोहक, आकर्षक असणारा पक्षी बिया, धान्य, कंदमुळे खातो. देवगाव-पंचकेश्वर येथील तरुण शेतकरी अक्षय ढोमसे यांच्या शेतात आज सकाळी निपचित पडलेला आढळला. त्यांनी मला फोनवरून त्याची माहिती दिली असता, हा कॉमन क्रेन पक्षी होता, असे पक्षीमित्र डॉ. डेर्ले यांनी सांगितले.
मी व पक्षीमित्र राहुल वटघुले आम्ही स्वत:ची गाडी व वन कर्मचाऱ्यांच्या मदतीने निफाडच्या वन उद्यानात जखमी क्रेनला आणले. त्याचा डावा पाय मोडलेला आढळला.
वनाधिकारी भगवान जाधव व राजेंद्र दौंड यांच्याशी विचारविनिमय करून नाशिक येथील रिहाबिलटेशन सेंटरमध्ये उपचारासाठी पाठविला. बरा झाल्यावर नांदूरमधमेश्वर पक्षी अभयाण्यात त्यास सोडण्यात येईल, अशी माहिती डॉ. उत्तमराव डेर्ले यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.