Devmamledar memorial temple & vijay wagh esakal
नाशिक

Nashik : देवमामलेदार स्मारक कामाची होणार चौकशी

सकाळ वृत्तसेवा

सटाणा (जि. नाशिक) : येथील देव मामलेदार श्री यशवंतराव महाराज स्मारकाच्या कामाची लवकरच दक्षता व गुण नियंत्रक मंडळातर्फे चौकशी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ यांनी मंगळवारी (ता. २५) दिली. (Inquiry into Devmamaledar memorial work to be held Nashik News)

श्री. वाघ म्हणाले, महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागाने कोट्यवधी रुपयांचा निधी या स्मारकासाठी मंजूर केला होता. पालिकेने स्मारक कामाचे भूमिपूजन राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांच्या हस्ते मोठा गाजावाजा करुन केले होते. मात्र, संबंधित ठेकेदाराने नियोजित आराखड्याप्रमाणे काम न करताच घिसडघाईने जुन्या इमारतीस जुजबी डागडुजी करून बिले काढली. स्मारकाचे काम अपूर्ण असताना बिले काढल्याचेही आम्ही पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. या निकृष्ट व प्रलंबित कामाची चौकशी करावी, या मागणीसाठी ८ फेब्रुवारी २०२२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पालिका प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलनही छेडले होते.

त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई येथील कार्यालयाचे कक्षाधिकाऱ्यांकडे या कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून मिळण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार मुंबईच्या कक्ष अधिकाऱ्यांनी नाशिक येथील दक्षता व गुण नियंत्रण मंडळाला देवमामलेदार यशवंतराव महाराज स्मारक कामाचे तांत्रिक लेखापरीक्षण करून त्याचा अहवाल त्वरित सादर करण्याचे आदेश दिले आहेत. लवकरच स्मारकाच्या बांधकामाबाबत शहरवासियांना गुणनियंत्रक विभागाचा अहवाल अवगत करणार असल्याचेही श्री. वाघ यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT