नाशिक : अन्नासाठी थेट प्राण्यांना, कीटकांना गिळंकृत करणाऱ्या कीटकभक्षक आणि पश्चिम घाटासोबत नाशिकमध्ये आहेत. आतापर्यंत हॉलिवूडपटातून अथवा पाठ्यपुस्तकातून दर्शन देणाऱ्या अशा वनस्पती त्र्यंबकेश्वर परिसरात बहरल्या आहेत. ड्रोसेरा इंडिया ही वनस्पती स्थानिकांमध्ये गवती दवबिंदू म्हणून परिचित आहे.
गवती दवबिंदू म्हणून परिचित
दक्षिण आफ्रिकेच्या घनदाट अरण्यात माणसांनाही खाणाऱ्या मांसाहारी वनस्पतींचे चित्रण चित्रपटांमधून होते. किडे, कीटकांना आकर्षित करून त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या वनस्पतींच्या अनेक जाती आहेत. अशा वनस्पती प्रामुख्याने उंच डोंगरमाथ्यावर, भरपूर पावसाच्या प्रदेशात आढळतात. पावसामुळे डोंगरमाथ्यावरील जमिनीची झीज होऊन बरेचसे क्षार विरघळून जातात. त्यामुळे तगून राहण्यासाठी या वनस्पतींना क्षारासाठी बाहेरचा स्रोत शोधावा लागतो. तग धरून राहण्यासाठी या वनस्पतींनी स्वत:मध्ये हा बदल करून घेतला. अशा वनस्पती मेघालय, पश्चिम घाट अशा भरपूर पावसाच्या प्रदेशांमध्ये आढळतात. या वनस्पतींच्या पानांचा आकार मध्यभागी खोलगट असल्याने त्यांना घटपर्णी म्हटले जाते. आयुर्वेदामध्ये औषधी गुणधर्मासाठी नोंद असलेली चित्रक ही वनस्पतीही कीटकभक्षी आहे. पांढऱ्या व निळ्या रंगांची फुले येणाऱ्या वनस्पती पश्चिम घाटात आढळतात.
जगभरात कुठे अढळतात या वनस्पती?
त्र्यंबकेश्वरजवळील कळमुस्ते घाटात ड्रोसेरा इंडिका (गवती दवबिंदू) आढळून आली असून, ही वनस्पती छोटे कीटक खाते. ड्रोसेरा इंडिका कॉम्प्लेक्सची प्रजाती आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, भारत, दक्षिणपूर्व आशिया आणि पूर्वेकडील आशिया, जपानपर्यंत आढळतात. झाडे वर्षभर असतात आणि झटकन वाढतात. नंतर स्वत:च्या मृत्यूपर्यंत बहरतात. ते नैसर्गिकरीत्या वालुकामय मातीवर आणि पावसाळ्यात दलदलीच्या ठिकाणी आढळतात. ड्रोसेरा इंडिका कॉम्प्लेक्सच्या प्रजाती विशिष्ट ओल्या आणि कोरड्या हंगामासह उष्णकटीबंधीय आणि उपोष्णकटीबंधीय ठिकाणी वाढतात. निसर्गात पावसाळ्याच्या सुरवातीला बिया फुटतात. चांगली वाढ होण्यासाठी वनस्पतींना खूप उबदार आणि चमकदार परिस्थितीची आवश्यकता असते. या प्रजातींसाठी माती आणि पाण्याची आवश्यकता यामध्ये बरेच बदल आहेत. काही प्रत्यक्षात पाण्यात वाढतात.
ड्रोसेरा वैज्ञानिकांचे नाव
ड्रोसेरा इंडिका ही एक कीटकनाशक वनस्पती आहे. ड्रोसेरा इंडिका तंतुमय रूट सिस्टिमद्वारे समर्थित औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीमधील फुले कीटकांना आकर्षित करतात. फांद्यांवरील चिकट द्रव कीटकांना सापळ्यात अडकून ठेवते. मासांहारी वनस्पतीच्या सर्वात मोठ्या पिढीपैकी एक आहे. वैज्ञानीक डॉ. ड्रोसेरा यांच्या नावावरुन ही वनस्पती ओळखली जाते.
संपादन - ज्योती देवरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.