Vegetable market on the street. esakal
नाशिक

Nashik News : भाजीबाजार थेट रस्त्यावर; वाहन कोंडीसह अपघातांना आमंत्रण

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी (जि. नाशिक) : महापालिकेकडून भाजी विक्रेत्यांसाठी काही ठिकाणी खास जागा उपलब्ध करून दिली असली तरी, विक्रेत्यांच्या थेट रस्त्यावरच भाजीबाजार मांडण्याच्या अट्टहासाने वाहन कोंडीसह अपघातांना आमंत्रण मिळत आहे. (insistence of vendors to set up vegetable markets right on streets is inviting accidents including vehicular traffic jam nashik news)

मखमलाबाद रोडवर भाजीबाजार व मच्छी बाजार अशाच प्रकारे भरत आहे. विक्रेत्यांकडे भाजीपाला खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची वाहने रस्त्यावर पार्क केली जात असल्याने येणाऱ्या वाहनांना अडथळे निर्माण होतात. त्यामुळे वाहनांची कोंडी होते.

मखमलाबाद गाव ते मखमलाबाद नाका, मखमलाबाद- म्हसरूळ लिंक रोड या दोन मुख्य रस्त्यांच्या कडेला भाजीबाजार तसेच मटण- मच्छी बाजार भरत आहे. हे बाजार थेट रस्त्याच्या कडेलाच भरविले जातात. मखमलाबाद परिसरातील शांतिनगर, शिंदेनगर, मानकरनगर, गुलमोहरनगर या परिसरातील रस्त्यांचे भाग बाजाराच्या वेळी विक्रेत्यांनी व्यापले आहेत.

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

बाजारासाठी मोकळ्या आणि रस्त्यापासून काहीशा अंतरावर व्यवस्था करणे गरजेचे आहे. त्यानुसार काही भागात अशी व्यवस्था असतानाही विक्रेते थेट रस्त्यावरच भाजीपाल्याचे दुकाने मांडत आहेत. हे चित्र पंचवटी परिसरातील जवळपास सर्वच रस्त्यांच्या कडेला दिसते.

रस्त्यावरून जाणारे ग्राहक थांबून आपल्या भाजीपाला खरेदी करतील, या उद्देशाने रस्त्यावरच भाजीपाला मांडून विक्री करण्यावर अनेक विक्रेत्यांचा कल असतो. त्यामुळेच असे बाजार भरू लागले आहेत.

समस्या सुटण्याऐवजी वाढती

वास्तविक ग्राहक हा सर्वच बाजार फिरून त्याला योग्य वाटेल अशाच तेथूनच भाजीपाला खरेदी करीत असतो. असे असतानाही प्रत्येक विक्रेता जास्त जास्त ग्राहक आपल्यापर्यंत कसे पोचतील, या अपेक्षेने थेट रस्त्यावरच्या जागेची निवड करून तेथे भाजीपाला विक्रीसाठी ठेवतो.

अशा प्रकारे भरणाऱ्या बाजारावर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून कारवाई केली जाते. मात्र, या कारवाईनंतर या पथकाची पाठ फिरताच हे बाजार पुन्हा जैसे थे असे बसले जातात. त्यामुळे ही रस्त्यावरच्या बाजाराची समस्या सुटण्याऐवजी वाढतच आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray Dasara Melava 2024: पुढच्या महिन्यापर्यंतच पैसे येतील, नंतर येणार नाहीत"; 'लाडकी बहीण'बाबत राज ठाकरेंचा खळबळजनक दावा

नवाब मलिक यांच्या जावयाच्या निधनाचे वृत्त अफवा! महत्त्वाची अपडेट समोर...

Baba Siddiqui murde Pune connection: बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या तिसऱ्या आरोपीची ओळख पटली, पुण्यात होता कामाला...

Bishnoi Gang-Baba Siddique: "सलमान-दाऊद गँगची मदत करणाऱ्यांनो..." बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी अखेर बिश्नोई टोळीने स्वीकारली

गोफण | आमच्याही पक्षात कलाकार पाहिजे!

SCROLL FOR NEXT