While inspecting the damaged area in the taluka on Wednesday, Agriculture Commissioner Praveen Gedam, D. B. Mughal etc. 
नाशिक

Nashik Unseasonal Rain: कृषी आयुक्तांसमोर शेतकऱ्यांना अश्रू अनावर; गेडाम यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्ष, कांदा व भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. मदत व पुनर्वसनमंत्र्यांनी जिल्ह्याची पाहणी केल्यानंतर कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांनी निफाड तालुक्याला भेट दिली.

त्यांच्यासमोर व्यथा मांडताना शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. शेतकऱ्यांचे अश्रू बघून गेडाम यांनाही अतीव दुःख झाले. (Inspection of damaged area by Agriculture Commissioner Praveen Gedam in niphad nashik news)

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे ३४ हजार हेक्टरला तडाखा बसला आहे. यात सुमारे १२ हजार हेक्टरवरील द्राक्षबागा आडव्या झाल्या आहेत, तर दहा हजार हेक्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाले. राज्यात सर्वाधिक नुकसान हे नाशिक जिल्ह्यात झालेले असल्यामुळे कृषी आयुक्त गेडाम यांनीही निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेट घेतली.

आपले दुःख मांडताना शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. तळहातावरील फोडाप्रमाणे द्राक्षबाग सांभाळली. हाता-तोंडाशी आलेला घास पावसाने एका क्षणात हिरावून घेतला.

आता कोणाकडे मदत मागायची साहेब तुम्हीच सांगा, अशा शब्दांत त्यांनी व्यथा मांडली. गेडाम यांनी शेतकऱ्यांना धीर देत शक्य तेवढ्या लवकर शासकीय मदत करण्याची ग्वाही दिली. त्यांच्यासोबत कृषी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: डोनाल्ड ट्रम्प जिंकले तर शेअर बाजार कोसळणार; कमला हॅरिस अध्यक्ष झाल्यास काय होईल?

भाजपची 'ती' ऑफर स्वीकारली असती, तर जयंतराव आणि मी लालदिव्यातून फिरलो असतो; सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्यस्फोट

हे काय वागणं आहे... Bigg Boss 18 मधील 'या' स्पर्धकावर भडकली रुपाली भोसले; सिद्धार्थ शुक्लासोबत तुलना करत म्हणाली-

Fact Check :'गंभीरकडून काही होणार नाही, मला कमबॅक करावं लागेल'; MS Dhoniचा Video Viral, चाहते सैराट

Latest Marathi News Updates live : अजित पवार गटातील कार्याध्यक्ष, जनरल सेक्रेटरींची शरद पवारांच्या पक्षात घरवापसी

SCROLL FOR NEXT