Inspirational News Overcoming death Rukhminitai became an idol nashik  esakal
नाशिक

Inspirational News: मरणावर मात करत रुक्मिणीताई बनल्या आयडॉल

संकट आणि आव्हाने जणू पाचवीलाच पूजलेली होती... अठराविश्वे दारिद्र्य असलेल्या कुटुंबाचा सदस्य होताना आयुष्याच्या प्रत्येक पावलावर संकटांची मालिका येतच होती.

विजयकुमार इंगळे: सकाळ वृत्तसेवा

संकट आणि आव्हाने जणू पाचवीलाच पूजलेली होती... अठराविश्वे दारिद्र्य असलेल्या कुटुंबाचा सदस्य होताना आयुष्याच्या प्रत्येक पावलावर संकटांची मालिका येतच होती. गरिबीशी दोन हात करत संकटांना सामोरे जात असतानाच कंपनीत एक हजार ८०० किलो वजनाचा भार अंगावर पडल्याने मणके तुटले. मात्र त्या वाचल्या. या दुर्घटनेत कोमातून बाहेर आल्या.

याच काळात आयुष्यात तब्बल चार ते पाच वेळा पतीने गळा आवळून मारण्याचा प्रयत्न केला. नशिबाची दोरी भक्कम असल्याने जणू काही तिने मरणाशीच दोन हात करण्याचा निश्चय केला. आत्मविश्वासातून जगण्याचं बळ उभं करणाऱ्या सिडकोतील उत्तमनगर येथील दुसरी पास व अकाली आलेल्या अपंगत्वावर मात केलेल्या रुक्मिणीताई गवळी डोळस समाजासाठी आयडॉल ठरल्या आहेत... (Inspirational News Overcoming death Rukhminitai became an idol nashik)

दोनवेळ पोटभर भाकरी मिळावी, अशी माफक गरज असलेल्या कुटुंबातील रुक्मिणीताई पांडुरंग गवळी यांचे माहेर मराठवाड्यातील आंबेजोगाई तालुक्यातील... दुसरीत असतानाच शाळेकडे पाठ फिरवली. वडील मारुती मनोहर रगडे यांचे पत्नी वणूबाईसह तीन मुले व एक मुलगी असं मोठं कुटुंब... दुष्काळी परिस्थितीमुळे कुटुंबाने नाशिक गाठलं. इथे बांधकामावर मारुती रगडे यांच्यासह पत्नीही बांधकाम मजूर म्हणून कामाला होत्या.

रगडे परिवारातील रुक्मिणीताई ज्येष्ठ कन्या होत्या. नाशिकच्या पांडवलेणी परिसरातील झोपडपट्टीवजा पालाच्या घरात बिऱ्हाड थाटलेल्या परिवारासाठी त्यांची धडपड सुरू होती. वयाच्या सातव्या वर्षीच कुटुंबासाठी आधार होत रुक्मिणीताईंना कामासाठी बाहेर पडावे लागले.

परिस्थितीने जगायला शिकवले

परिस्थितीमुळे निरक्षर राहिलेल्या आई-वडिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी पीटीसीसमोरच्या वसाहतीत बिऱ्हाड हलवले. त्यानंतर उत्तमनगर येथे भाडेतत्त्वावरच्या खोलीत संसार थाटला. महापालिका शाळेत मुलांच्या शिक्षणासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते, मात्र रोजच्या रोजगाराची सांगड घालताना दमछाक होत होती.

रुक्मिणीताई घरात ज्येष्ठ असल्याने दुसरीत असताना त्यांनी शाळेकडे पाठ फिरवली. आई-वडिलांना मदत म्हणून त्या उत्तमनगर परिसरात गल्लोगल्ली भाजीपाला विक्री करू लागल्या. त्यातून मिळालेल्या पैशांतून कुटुंबासाठी त्या खारीचा वाटा उचलत होता. मात्र याच काळात त्यांचा विवाह झाल्याने त्यांचे काम सुटले.

आगीतून फुफाट्यात

वडिलांनी रुक्मिणीताई यांचा विवाह गावाकडील कुटुंबात करून दिला. पतीचेही शिक्षण जेमतेम... शेळ्या चारणाऱ्या मुलासोबत विवाह झाल्याने रुक्मिणीताईंची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी झाली. रोजच मजुरी करण्याबरोबरच कुटुंबातील भांडणं जणू त्यांच्या पाचवीलाच पूजलेली होती.

सोबतच पतीकडून होणाऱ्या छळाला त्यांना सामोरे जावे लागत होते. अशातच कुटुंबात तीन मुले व एक मुलगी असा परिवार वाढलेला असताना पती गावाकडून परागंदा झाला. कपाळावरचं कुंकू टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी पतीचा शोध घेत पुणे गाठलं.

संकटांची मालिका थांबेना...

पुण्यात पडेल ते काम करत मुलांना आधार देण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. मात्र पतीच्या वागण्यात अजिबात फरक पडला नाही. चारही मुलांसाठी त्यांनी स्वतःच आटापिटा सुरू ठेवला. याच काळात त्यांच्या भावांनी दिलेला आधार मोलाचा असल्याचे सांगताना त्यांचे डोळे पाणावले.

पुण्यातील एका कंपनीत काम करत असताना थेट एक हजार ८०० किलो वजनाचा भार त्यांच्या अंगावर पडल्याने त्यांचे मणके तुटले आणि त्या कोमामध्ये गेल्या. सुदैवाने त्या कोमातून बाहेर आल्या. याच काळात त्यांचा चार ते पाचवेळा पतीने गळा आवळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रुक्मिणीताईंना त्यांच्या आई-वडिलांनी थेट नाशिकला आणले.

आव्हानांनाच दिले आव्हान

नाशिकमध्ये आल्यानंतर त्यांनी अंथरुणाला खिळलेल्या परिस्थितीतही झोपूनच कंपनीतील घरगुती कामे करत स्वतःला गुंतवून घेतले. आयुष्यात आलेली परिस्थिती आपण बदलू शकत नाही. मात्र त्यावर मात नक्कीच करू शकतो, असा विचार करत त्यांनी मुलांवर चांगले संस्कार केले. त्यांचे शिक्षण करतानाच त्यांनी नाशिकच्या महाजननगर परिसरात शहाळे विक्री (नारळपाणी) करण्याचा व्यवसाय सुरू केला.

स्वतःच्या तब्यतेची काळजी घेतानाच शहाळे विक्रीच्या माध्यमातून रुग्णांसाठी आधार बनलेल्या रुक्मिणीताईंचा संघर्ष समाजमनात अपवाद ठरलाय. स्वतःसाठी जगताना कोणापुढेही हात न पसरता कष्ट करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचं आई-वडिलांकडून बाळकडू मिळालेल्या रुक्मिणीताई यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. कोमातून बाहेर पडतानाच आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांची प्रेरणादायी वाटचाल सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT