Sunandatai shejwal esakal
नाशिक

Inspirational News: सुई-दोरा बनला चांदवडच्या सुनंदाताईंच्या कुटुंबाचा आधार!

विजयकुमार इंगळे

माहेरच्या मोठ्या कुटुंबात वाढताना शेतमजुरी करण्याशिवाय पर्यायच नव्हता... आई-वडिलांना आधार होताना द्रोण-पत्रावळी शिवण्याचे काम त्या करीत होत्या. आयुष्यात आलेल्या परिस्थितीतही जगण्यासाठी बळ दे, एवढंच मागणं त्या देवाकडे मागत राहिल्या.

सासरीही परिस्थिती जेमतेम... कितीही संकटं आली तरी त्यातून नक्कीच बाहेर पडणार, या जिद्दीने त्या स्वतःलाच प्रोत्साहन देत राहिल्या.

पतीला आलेल्या अकाली आजारपणातही खचून न जाता शिवणकामातून कुटुंबासाठी आधार बनल्या, त्या ओतूरच्या (ता. कळवण) माहेरवाशीण आणि चांदवडच्या रहिवासी सुनंदाताई शेजवळ (तेली).. (Inspirational News Sui Dora became mainstay of Chandwad Sunandatai shejwal family nashik)

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

कुटुंबाच्या परिस्थितीमुळे नववीतच शिक्षण सोडाव्या लागलेल्या सुनंदाताई संजय शेजवळ यांचे माहेर ओतूरचे; तर सासर चांदवड शहरातील. वडील मार्तंड वामन सोनवणे यांचं पत्नी सुमनबाई यांच्यासह चार मुली, दोन मुलं असं मोठं खटल्याचं कुटुंब होतं.

मोलमजुरी करण्याशिवाय पर्याय नसल्याने पडेल ते काम करीत कुटुंबासाठी सुनंदाताईंचे वडील हातभार लावत होते. वडिलांना मदत म्हणून आई सुमनबाई यांच्यासह सुनंदाताई याही घरातील ज्येष्ठ कन्या असल्याने शालेय जीवनात कुटुंबात कामासाठी सरसावल्या.

कुटुंबासाठी दोन पैशांची मदत व्हावी, यासाठी त्याही झाडांच्या पानांपासून द्रोण, पत्रावळी तयार करण्यासाठी मदत करीत होत्या. या व्यवसायातून तुटपुंजी कमाई मिळत होती, तरीही घराला आधार मिळेल, या आशेने सर्व सुरू होते.

शिक्षण अर्ध्यावरच सुटलं

कुटुंबाची जबाबदारी कमी करताना वडिलांनी लवकर लग्न केल्याने नववीतच शिक्षण सोडावे लागले. पती संजय यांचंही शिक्षण जेमतेम... चांदवडला सासरी शेजवळ कुटुंबाचीही परिस्थिती साधारण. पती संजय शेजवळ गॅरेजच्या माध्यमातून कुटुंबाला आधार देत होते.

मात्र, वर्षभरानंतर कुटुंबाला आधार देताना पर्याय उभा राहावा, यासाठी सुनंदाताईंची धडपड सुरू होती. गॅरेज व्यवसायातील स्पर्धा आणि मिळणारा मोबदला कमी असल्याने सुनंदाताई यांनी कुटुंबाची धुरा स्वतःकडे घेण्याचा निर्णय घेतला.

याच काळात त्यांनी चांदवडमध्ये शिवणकामाचे प्रशिक्षण घेत शिवणकाम व्यवसाय सुरू केला. याच काळात कुटुंबात मुली रूपाली, वृषाली, चैताली व मुलगा आकाश यांच्यानिमित्त सदस्य संख्या वाढली. मात्र, कुटुंबासाठी आर्थिक आधार होतानाच त्यांनी मुलांच्या शिक्षणाकडेही लक्ष पुरविले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

परिस्थितीलाच दिले आव्हान

कुटुंबासमोर असलेल्या आव्हानांना तोंड देत असतानाच याच काळात पतीला आलेल्या आजारपणातही खचून न जाता त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. परिस्थितीला बदलावेच लागेल, असा जणू चंगच मनाशी बांधत त्यांची लढाई सुरू झाली.

कधीकाळी कुटुंबावर उपासमारीची वेळ येते की काय, अशी भीती असताना या काळातही त्या आत्मविश्वास कमी होऊ न देता संधीची वाट पाहत होत्या. आयुष्याचा जीवनपट उलगडताना मात्र त्यांना अनेकदा अश्रू आवरणे कठीण बनले होते.

शिवणकामातून उभ्या राहत असताना पहिल्याच दिवशी त्यांना ४० रुपयांची कमाई झाली. येथूनच खऱ्या अर्थाने सुनंदाताई यांच्या व्यवसायाला जणू उभारीच मिळाली. मेहनत, चिकाटी आणि मनमिळाऊ स्वभावामुळे अल्पावधीतच महिलांना सुनंदाताई यांनी आपलेसे केले.

त्याचा त्यांना व्यवसायवृद्धीसाठी चांगलाच फायदा झाला. रोजच्या धकाधकीच्या जीवनात मुलांना प्रोत्साहन देताना परिस्थितीची जाणीव करून देत राहिल्या.

स्वतः अल्पशिक्षित, मुलं उच्चशिक्षित...

आयुष्यात आलेल्या संकटांमध्ये अभ्यासात हुशार असूनही नववीत असतानाच शिक्षणापासून दूर जावे लागले. याबाबतची सल त्यांच्या मनात नेहमीच होती. आपल्याला शिक्षणापासून वंचित राहावे लागले, याची जाणीव ठेवून त्यांनी मुलांना उच्चशिक्षित केले.

ज्येष्ठ कन्या रूपाली वाघ या शिक्षिका असून, सामाजिक कार्यातही त्यांचे मोठे योगदान आहे. वृषाली महाले यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. चैताली या वाणिज्य शाखेच्या पदवीधर असून, मुलगा आकाशनेही शिक्षण पूर्ण करतानाच स्वतःचे वेल्डिंग वर्कशॉप सुरू केले आहे.

पतीच्या आजारपणात कुटुंबाचा आधार होतानाच आर्थिक स्थैर्य देत चांदवड शहरात सुनंदाताईंनी स्वतःची ओळख उभी केलीय.

महिलांसाठी बनल्या आधार

शिवणकामातून स्वतःच्या कुटुंबाची आर्थिक घडी बसविताना, शहरातील चार महिलांना मोफत प्रशिक्षण देतानाच याच व्यवसायात महिलांची आर्थिक घडी बसवून देण्यात सुनंदाताई यांनी योगदान दिलंय.

परिस्थिती कशीही असली, तरी ती नक्कीच बदलते, या सकारात्मक विचारांवर आयुष्यात आलेल्या आव्हानांचा पाठलाग करताना खचून न जाता कुटुंबाला त्यांनी उभं केलंय.

कुटुंबाला आर्थिक खाईतून बाहेर काढतानाच पती संजय शेजवळ यांचाही आत्मविश्वास कमी होऊ न देता, सुई-दोराच आयुष्याचा आधार मानत सुनंदाताई भक्कमपणे उभ्या राहिल्या.

व्यवसायाला पुढे नेतानाच आई-वडील, पती संजय शेजवळ, नणंद मंगला पवार, मुली, जावई, मुलगा आकाश, तसेच सोनवणे व शेजवळ परिवाराने वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनामुळे परिस्थितीशी दोन हात करीत शिवणकामातून कुटुंबाला उभ्या केलेल्या सुनंदाताई शेजवळ या नक्कीच महिलांसाठी प्रेरणास्थान बनल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: सोनं झालं 5,000 रुपयांनी स्वस्त; अवघ्या 15 दिवसांत सोन्याच्या भावात मोठी घसरण, आज काय आहे भाव?

वर्तुळ पूर्ण! Tim Southee ची कसोटी मधून निवृत्ती; ज्या संघाविरुद्ध पदार्पण, त्यांच्याविरुद्धच शेवटचा सामना

Latest Maharashtra News Updates : 'कटेंगे तो बटेंगे' हा देशाचा इतिहास- देवेंद्र फडणवीस

Dehradun Accident: देहराडूनमध्ये भीषण अपघात, सहा तरुणांचा मृत्यू; काय आहे इनसाईड स्टोरी? पोलिसांकडे अद्याप तक्रार नाही

IND vs AUS: विराट कोहली जखमी? काल अचानक स्टार फलंदाज ऑस्ट्रेलियातील हॉस्पिटलमध्ये गेला अन्...

SCROLL FOR NEXT