Inspirational story Anjalitai become an entrepreneur nashik news esakal
नाशिक

Inspirational News : परिस्थितीवर मात करत अंजलीताई बनल्या उद्योजिका

आयुष्यातील पाऊलवाट सकारात्मक विचारांनी जपत तिची धडपड सुरू होती. कुटुंबाच्या वाट्याला आलेल्या प्रतिकूल दिवसांतही परिस्थितीला बसून राहण्याची मुभा नाही, या विचारांवर ठाम राहत कुटुंबाच्या पाठीमागे ती खंबीरपणे उभी राहिली.

विजयकुमार इंगळे

Nashik News : तुटपुंज्या भांडवलावर सुरू केलेला हॉटेल व्यवसायाला कष्ट, चिकाटीच्या जोरावर पुढे नेताना नाशिकमध्ये ओळख उभी केली ती मेन रोडच्या अलंकार हॉटेलच्या संचालिका अंजलीताई आमले यांनी...

परिस्थिती कशीही असली तरी त्यात जगायचं कसं, याचा सारिपाठच जणू घालवून दिलेल्या बोमानी सखाराम शिरसाठ यांच्या कुटुंबातील अंजलीताई या ज्येष्ठ कन्या. अंजलीताईंचे शिक्षण जेमतेम दहावी. माहेर आणि सासर दोन्हीही नाशिकमधीलच.

अंजलीताईंचे वडील टॅक्सी ड्रायव्हर होते. मात्र कुटुंबातील सदस्यांची जबाबदारी पार पाडताना तारेवरची कसरत होती. (Inspirational story Anjalitai become an entrepreneur nashik news)

त्यामुळे वयाच्या तेराव्या वर्षीच आईसोबत अंजलीताई याही कुटुंबाला हातभार लावण्यासाठी विडी कामगार म्हणून काम करत होत्या. वाट्याला आलेल्या परिस्थितीतही लढण्याचं बळ मिळालेल्या अंजलीताई या कधीही कठीण काळात खचून गेल्या नाहीत. कुटुंबाची जबाबदारी कमी करतानाच लवकर लग्न झाल्याने अंजलीताईंचे शिक्षण अर्ध्यावरच सुटले.

अंजलीताईंचा विवाह नाशिक शहरातीलच विजय आमले यांच्याशी झाला. पती विजय यांचेही शिक्षण जेमतेम. बालपणापासूनच कष्टाचं बाळकडू मिळालेल्या अंजलीताईंनी सासरी असलेल्या गरिबीच्या परिस्थितीत जुळवून घेतले. पती नाशिक शहरात रिक्षा चालवत होते. याच काळात त्यांनी गॅरेजही सुरू केले.

सासरे लालूशेठ यांनी शहरातील मेन रोड भागात किराणा दुकानही सुरू केले होते. सातवीत असतानाच लग्न झाल्याने सासरी आल्यावर शिक्षण पूर्ण करण्यासाठी कुटुंबाने प्रोत्साहन दिल्याने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

कुटुंबासाठी उभ्या राहिल्या

नाशिक शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता कुटुंबाने मेन रोड परिसरात ह़ॉटेल सुरू करण्याचा निर्णय घेतला. याच काळात कुटुंबात मुले भूषण व विशाल, तसेच मुली प्रसन्ना व चारुताई यांच्यानिमित्ताने कुटुंबाचा विस्तार वाढला होता. तुटपुंज्या भांडवलावर हॉटेल व्यवसायाला सुरवात करताना कुटुंबासाठी मोठा आधार उभा राहिला.

अलंकार हॉटेलच्या निमित्ताने नाशिकमध्ये मेन रोड परिसरात व्यवसायाला सुरवात करताना पहिल्याच दिवशी शंभर रुपये कमाई झाली. अंजलीताई हॉटेल व्यवसाय सांभाळत असताना पती विजय यांचे गॅरेजही सुरू होते. हॉटेल व्यवसायाला पुढे नेण्यासाठी कुटुंबाने गॅरेज बंद करण्याचा निर्णय घेतानाच अंजलीताईंना बळ दिले.

येथूनच आमले कुटुंबाच्या यशाची वाट गवसली. माहेरी असताना परिस्थितीशी दोन हात झगडत तोच कित्ता गिरवताना सासरीही त्यांनी केलेल्या कष्टाचं चीज झालं. कधीकाळी हॉटेल व्यवसायासाठी भांडवल उभे करण्यासाठी अडथळ्यांची शर्यत पार केलेल्या अंजलीताई यांच्या आमले परिवाराने नाशिक शहरातील स्थित्यंतरापासून स्वतःची ओळख जपलीय.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कष्टातून यश खेचून आणले

परिस्थितीमुळे तुटपुंज्या पैशांवर विड्या वळणारे हात नाशिक शहरात उद्योजिका म्हणून भक्कम झाले आहेत. केवळ कुटुंबासाठी आधार न ठरता या व्यवसायाच्या माध्यमातून १३ कुटुंबांना कायमस्वरूपी रोजगाराची संधीही उपलब्ध करून दिलीय.

गेल्या अनेक वर्षांपासून आमले परिवारासोबत काम करणाऱ्या कुटुंबांना दिलेला आधार नक्कीच बळकटी देणारा ठरला आहे. प्रतिकूल परिस्थितीतही आयुष्याला दिशा देताना सकारात्मक विचारांची जोड देताना खेचून आणलेलं यश नक्कीच मोलाचं आहे.

महिलांनी भक्कम व्हावे

उद्या येणारी वेळ कशी असेल कोणीही सांगू शकत नाही; मात्र कुटुंबासाठी भक्कम उभे राहताना महिलांनी स्वतःमधील कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न केले तर नक्कीच यश मिळते. प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटीच्या जोरावर व्यवसायात स्वतःची ओळख उभ्या केलेल्या अंजलीताई यांना सासरे लालूशेठ, पती विजय, मैत्रिणी आणि सामाजिक कार्यकर्त्या उषाताई शेलार, मंगलाताई पवार

यांच्यासह मुले भूषण, विशाल, सुना सुचिता, पूनम, तसेच शिरसाठ व आमले परिवाराच्या पाठबळामुळे मिळालेलं यश नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी ठरलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT