Nashik News : बडेबडे क्लास तर दूरच..पण कॉलेजची फि भरायलाही पैसे नाही, इतक्या गरीब शेतकरी कुटुंबातील गौरव कदम आणि अंदरसूलमध्ये रेडियमचा व्यवसाय करणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील स्वागत घोडेराव यांनी आयआयटीच्या प्रवेशासाठी लाखो रुपये शुल्क भरून दोन वर्ष क्लास लावणाऱ्यांची बोलती बंद केली आहे.
घरीच अभ्यास करून या दोघांनी मिळवलेले यश कौतुकास्पद असून दोघांचाही आयआयटीचा प्रवेश निश्चित झाला आहे.(Inspirational Story IIT dream come true by studying at home No money for private classes ideal of Andarsul Swagat and gaurav glory despite lack of extra facilities Nashik News)
कुठलीही परिस्थिती यशाच्या आड येत नाही, हेच या दोन सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी दाखविले आहे. दहावी उत्तीर्ण झाले, की आयआयटीचे स्वप्न पाहून लातूर, पुणे, नाशिकमध्ये जाऊन दोन वर्षासाठी लाखो रुपये भरून अनेक पालक विद्यार्थ्यांची जेईई मेन्सची तयारी करतात.
मात्र कोळम येथील रात्रीचा दिवस करून शेतात राबराब राबणारे कैलास कदम हे सर्वसामान्य शेतकरी तर अंदरसूल येथील रेडियमचा व्यवसाय करून विद्यार्थ्यांच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च भागवणारे ‘सकाळ’चे बातमीदार संतोष घोडेराव यांच्या लेकानी सर्वांपुढे आदर्श उभा केला आहे.
बाहेरगावी क्लास न लावता घरी राहून अभ्यास केला तरी आयआयटीची स्वप्नपूर्ती होऊ शकते हे त्यांनी दाखविले आहे. क्लास शक्य नसल्याने गौरव कदम याने मिळेल तशी पुस्तके उपलब्ध करून घरीच अभ्यास केला. स्वागत घोडेराव याने अल्प खर्चात खासगी ऑनलाईन क्लास लाऊन हे यश मिळविले आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
शहरातील स्वामी मुक्तानंद ज्युनिअर कॉलेजचे हे दोन्ही विद्यार्थी आहेत. नुकत्याच झालेल्या आयआयटी ॲडव्हान्स परीक्षेमध्ये त्यांनी घवघवीत यश संपादित करून यशाचे शिखर गाठले आहे. दोघांचाही आयआयटी मधील प्रवेश सुकर झाला आहे.
गौरव कदम याने खुल्या प्रवर्गातून ६ हजार ४१० व इतर मागास प्रवर्गातून १ हजार ३२६ अशी रँक मिळवली आहे. स्वागत घोडेराव याने अनुसूचित जाती प्रवर्गामधून २ हजार ९१० रँक मिळवली आहे. गुणवत्ता यादीनुसार वरची रँक असल्यामुळे त्यांचा आयआयटीमधील प्रवेश निश्चित झाला आहे.
जेईई मेन्समध्ये गुणवत्ता यादीत आल्यावर जेईई अडव्हान्स परीक्षा त्यांनी दिली होती. ॲडव्हान्ससाठी भारतातून सुमारे दोन लाख विद्यार्थी प्रवेशित झाले होते. या दोन्ही परीक्षा उत्कृष्ट क्रमांकाने पास झाल्याने आता कदम व घोडेराव यांना भारतातील २३ आयआयटीपैकी गुणवत्तेनुसार कॉलेजप्रवेश मिळणार आहे.
स्वामी मुक्तानंद शिक्षण संकुलाचे अध्यक्ष डॉ. अमृत पहिलवान, संजय नागडेकर, सुधांशू खानापुरे, दीपक गायकवाड, शकुंतला पहिलवान, प्राचार्य सतीश पैठणकर, उपप्राचार्य अंबादास ढोले, सायन्स विभाग प्रमुख रामदास खैरनार आदींनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.