Sunita Shinde esakal
नाशिक

Inspirational Story | जिद्द : रामतीर्थाने दिली सुनीताताईंच्या आयुष्याला उभारी

विजयकुमार इंगळे

मिळालेला जन्म सार्थकी लावण्यासाठी प्रत्येकाचीच धडपड सुरू असते. मात्र कधी कधी परिस्थिती प्रतिकूल असल्याने त्यातून मार्ग काढणे अवघड होऊन बसते. सहा महिन्यांचीच असताना वडिलांचं छत्र हरपलं... जवळचं म्हणावं असं कोणीच नव्हतं... त्यामुळे जन्मतःच हातमजुरी वाट्याला आली.

मात्र परिस्थिती नक्कीच बदलेल, या सकारात्मक विचारांवर तिनं आयुष्यातील लढाई जिंकण्यासाठी स्वतःला तयार केलं... परिस्थितीतून वाट काढत आयुष्याला दिशा दिलीय, ती नाशिकच्या रामतीर्थावर चहाविक्रीतून उभ्या राहिलेल्या पाचवी पास सुनीताताई शिंदे यांनी..। (inspirational story of Sunitatai shinde selling chai on ramtirtha nashik news)

सुनीता विक्रम शिंदे यांचं माहेर निफाड तालुक्यातील उगावचे, तर सासर नाशिकमधीलच... वडील बाळकृष्ण मल्हारी निरभवणे यांच्या कुटुंबात जणू दारिद्र्य पाचवीलाच पूजलेलं... सुनीताताई यांचा जन्म झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांनी वडिलांचे निधन झाले... कुटुंबाचा आधारच गेल्याने आई मंदाबाई यांनी सुनीताताई यांना दात्याने येथे मामा रावसाहेब गांगुर्डे यांच्याकडे पाठवले.

मात्र गांगुर्डे परिवाराचीही परिस्थिती जेमतेमच... शालेय जीवनातच सुनीताताई यांना मोलमजुरी करण्यासाठी जावे लागले. त्यातच कुटुंबाने लवकर लग्न केल्याने पाचवीतच शाळा सुटली.

सुनीताताई यांचा विवाह नाशिक येथील विक्रम शिंदे यांच्याशी झाला. मात्र सासरीही परिस्थिती जैसे थे... लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच पुन्हा भाकरी मिळवण्याची लढाई सुरू झाली. पतीही हातमजुरी करत असल्याने सुनीताताई यांना कष्टाशिवाय पर्याय नव्हता.

कुटुंबाचा आधार होत त्यांनीही घरोघरी धुणीभांडी करून कुटुंबाला आधार देण्याचा जणू चंगच बांधला. याच काळात दियाच्या निमित्ताने कुटुंबातील सदस्य संख्या वाढली. सर्व काही सुरळीत होईल, असे वाटत असतानाच कौटुंबिक अडचणींमुळे कुटुंबात वाद उभे राहिले.

कौटुंबिक वादात मुलगी दियाच्या पालनपोषणाची जबाबदारी सुनीताताई यांच्यावर आली. कौटुंबिक वादात धुणीभांडी करण्याचे काम सुटल्याने सुनीताताई नाशिकमध्ये कपड्यांच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करत राहिल्या.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

कुंभमेळ्याने दिला आधार

दुसऱ्याच्या हाताखाली काम करत असतानाच स्वतःची ओळख निर्माण व्हावी, यासाठी त्यांची धडपड सुरू होती. याचदरम्यान नाशिकमध्ये कुंभमेळ्यानिमित्ताने सुनीताताई यांना संधी चालून आली. सेल्समन म्हणून तुटपुंज्या पगारातून बचत करत त्यांनी कुंभमेळ्याच्या पर्वणी काळात चहाविक्री सुरू केली.

येथूनच खऱ्या अर्थाने सुनीताताई यांच्या आयुष्यात प्रगतीचा मार्ग मिळाला. कुंभमेळ्याच्या संपूर्ण वर्षभर दिवसरात्र चहाविक्री करतानाच मेसचे डबेही तयार करण्याचे काम त्यांनी सुरू केले. व्यवसाय सुरू करण्याचे त्यांचे स्वप्न नाशिकच्या गोदामाईने दिल्याचे सांगताना त्यांचे डोळे पाणावले.

आयुष्यातील अनेक चढ-उतार पार करताना सुनीताताई यांनी खचून न जाता संयमाने परिस्थिती हाताळतानाच कुंभमेळा जणू आपल्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी निमित्त ठरल्याचे त्या अभिमानाने सांगतात.

नाशिकमधील कुंभमेळ्यातील पर्वणीकाळात तीन हजार रुपये भांडवलातून चहाविक्री सुरू करत पन्नास हजारांची कमाई केली. यातूनच त्यांनी स्वमालकीचे चहाविक्रीचे दुकान नाशिकच्या पंचवटी भागात सुरू केले.

हातमजुरी ते चहाविक्री व्यवसायाची मालकिण

निरभवणे आणि शिंदे कुटुंबातील सदस्य म्हणून वावरताना जन्मापासूनच संकटं जणू पाचवीलाच पूजलेली होती. अवघ्या सहा महिन्याच्या असतानाच वडिलांचं छत्र हरपलं. मात्र शालेय आयुष्यातच हातमजुरी करणाऱ्या सुनीताताई यांनी हातमजुरी, धुणीभांडी, मोलकरीण, सेल्समन असा प्रवास करत पंचवटीत चहाविक्री करत आर्थिक घडी बसवतानाच मुलगी दियासाठी मोठा आधार ठरल्यात.

आयुष्यात आलेली संकटं जणू आपली परीक्षा घेण्यासाठीच आलेली असतात, या सकारात्मक विचारांवर स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या सुनीताताई यांच्या प्रतिकूल परिस्थितीत मीनाताई देसले तसेच संगीता मोरे या मैत्रिणींसह मुलगी दिया यांचा आधार मोलाचा ठरल्याचे त्या सांगतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवृत्तीपूर्वी CJI DY Chandrachud आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल देणार? आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी

Pune: पुणे पोलिसांनी 'या' टोळीला केले जेरबंद, वाचा काय होता गुन्हा

Corn Upma Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा स्वादिष्ट कॉर्न उपीट, नोट करा रेसिपी

Kolhapur North : मधुरिमाराजेंनी माघार का घेतली? ईगो दुखावला, घरगुती समस्या की अन्य कारण..; उलटसुलट चर्चांना उधाण

Happy Birthday Virat Kohli : किंग कोहलीचे रेकॉर्ड तर तुम्हाला माहित्येय; आज भेटूया त्याच्या कुटुंबियांना, जाणून घेऊ त्यांच्याविषयी

SCROLL FOR NEXT