scholarship 
नाशिक

Nashik News: प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज निकाली काढा; शिक्षण सहसंचालक कार्यालयाच्‍या सूचना

सकाळ वृत्तसेवा

Nashik News: महाविद्यालय स्‍तरावर प्रलंबित असलेल्‍या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जांची तात्‍काळ पडताळणी करावी, अशा सूचना शिक्षण सहसंचालकांनी केल्‍या आहेत. गेल्‍या तीन शैक्षणिक वर्षांत महाविद्यालयस्‍तरावर ७७९ शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित आहेत.

शिष्यवृत्तीच्‍या दुसऱ्या हप्त्‍यासाठी महाविद्यालय स्‍तरावर प्रलंबित असलेल्‍या अर्जांची संख्या ३ हजार ३२२ इतकी आहे. कुठलाही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये, याची खबरदारी घेण्याच्‍या सूचनाही करण्यात आल्या आहेत. (Instructions from Office of Joint Director of Education to Dispose of pending scholarship application nashik news)

पुण्यातील शिक्षण सहसंचालक कार्यालयाने आपले कार्यक्षेत्र असलेल्‍या पुणे, नगर, नाशिक जिल्‍ह्‍यातील महाविद्यालये तसेच विद्यापीठांसाठी सूचना जारी केलेली आहे. त्‍यानुसार महाविद्यालय स्‍तरावर प्रलंबित शिष्यवृत्ती अर्जांचा तातडीने निपटारा करण्याच्‍या सूचना केल्‍या आहेत.

त्यात नमूद केले आह की, महाडीबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्ती योजनांकरिता विद्यार्थ्यांनी भरलेल्‍या ऑनलाइन अर्जांची पडताळणी महाविद्यालय स्‍तरावरुन करण्याबाबत परिपत्रकाद्वारे वेळोवेळी सूचना दिलेल्‍या होत्‍या. जिल्‍हानिहाय व्‍हॉटअॅप ग्रुपमध्ये वारंवार सूचनांद्वारे कळविले होते. तरीही २८ मार्चच्‍या डीबीटी डॅशबोर्डवर उपलब्‍ध अहवालानुसार पुणे विभागांतर्गत महाविद्यालय, विद्यापीठ व संस्‍था स्‍तरावर शैक्षणिक वर्ष २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ आणि २०२२-२३ मधील पडताळणीसाठी अर्ज प्रलंबित आढळले आहेत.

महाडीबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी भरलेल्‍या अर्जांवर रोजच्‍या रोज कार्यवाही करणे आवश्‍यक आहे.

विद्यार्थ्यांना दुसऱ्या हप्‍त्‍याचा शिष्यवृत्ती लाभ देण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयाच्‍या स्‍तरावरुन पडताळणी करावी.

दुसऱ्या हप्‍त्‍याच्‍या शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांना वेळेवर जमा होण्यासाठी महाविद्यालयाने सुद्धा सेकंड इन्‍स्‍टालमेंटसाठी प्रलंबित असलेली छाननी प्रक्रिया वेळेत करावी, अशा सूचना केल्‍या आहेत. कुठल्‍याही परीस्‍थितीत अर्ज प्रलंबित राहाणार नाही, याची खबरदारी घेण्याच्‍या सूचना दिलेल्‍या आहेत.

प्रलंबित अर्जांची स्‍थिती अशी-

शैक्षणिक वर्ष महाविद्यालय स्‍तर दुसऱ्या हप्त्‍याचे अर्ज

२०१९-२० -- १७१

२०२०-२१ ९५ ३४६

२०२१-२२ १३० ६५१

२०२२-२३ ५५४ २१५४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसर, कोथरूड, कसबा, शिवाजीनगर, पर्वती या जागांवर मनसे उमेदवार देणार

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT