Guardian Minister Dada Bhuse on Sunday inspecting the damage to the vineyard due to unseasonal rain and hail at Belbagh Mala. esakal
नाशिक

Dada Bhuse : आपत्तीग्रस्तांकडून पीककर्ज वसुली नको : पालकमंत्री दादा भुसे यांचे निर्दश

सकाळ वृत्तसेवा

Dada Bhuse : जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपिटीने मोठे नुकसान झालेले आहे. त्यातच जिल्हा बॅंकेकडून पीककर्जाची सक्तीने वसुली सुरू आहे. मात्र ज्या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर पीककर्जाची नोंद आहे अशा शेतकऱ्यांकडून जिल्हा बँकेने पीककर्ज सक्तीने वसूल करू नये असे निर्देश पालकमंत्री दादा भुसे यांनी आज दिले.

पंचनाम्याचे काम पन्नास टक्के पूर्ण झाले आहे. येत्या दोन दिवसांमध्ये उर्वरित पंचनामे पूर्ण करावेत, असेही त्यांनी सांगितले. (Instructions of Guardian Minister Dada Bhuse No recovery of crop loan from disaster victims nashik news)

श्री. भुसे यांनी आज साकोरे मिग (ता. निफाड), कुर्णोली, मोहाडी, खडक सुकेणे, चिंचखेड, जोपूळ (ता. दिंडोरी) येथील द्राक्षबागा आणि पिकांच्या नुकसानीची पाहणी श्री. भुसे यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, तहसीलदार पंकज पवार, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, तालुका कृषी अधिकारी विजय पाटील, माजी आमदार अनिल कदम, धनराज महाले, महाराष्ट्र राज्य द्राक्षबागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले आदी उपस्थित होते.

शेतकरी सुनील कळमकर यांच्या शेतात आच्छादनामुळे गारपिटीमुळे द्राक्षांचे फारसे नुकसान झाले नसल्याचे श्री. भुसे यांनी पाहिले. त्यावेळी द्राक्षबागांच्या आच्छादनासाठी सरकारच्या मदतीचा मुद्दा चर्चेत आला, तेव्हा त्यांनी द्राक्षबागांचे नुकसान टाळण्यासाठी आच्छादनाकरिता सरकारतर्फे प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

अवकाळीचा पुन्हा तडाखा

शनिवारी (ता.१५) इगतपुरी, सिन्नर, दिंडोरी आणि निफाड तालुक्याला पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपिटीने जोरदार तडाखा दिला होता. यात कांदा, गहू, भाजीपाल्याची पिके तसेच द्राक्षबागांची मोठी हानी झाली होती. शेवटच्या टप्प्यात असलेल्या द्राक्षबागांना दिंडोरी चालुक्यात सर्वाधिक फटका बसला.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

या नुकसानीची मंत्री भुसे यांनी आज सकाळी पाहणी करीत शेतकऱ्यांनी धीर देण्याचा प्रयत्न केला. दुपारून चारच्या सुमारास पुन्हा याच पट्ट्याला अवकाळीचा तडाखा बसला. आजच्या पावासाबरोबर विजांचा प्रचंड कडकडाट असल्याने शेतकरी पुरता हादरून गेला आहे. सिन्नरसह कसमादे पट्टयातही आजच्या पावसाने तांडव केले. यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पशूहानी झाली आहे.

वीज पडून दोन गायी, म्हशीचा मृत्यू

सटाणा : बागलाण तालुक्यात शनिवारी (ता.१५) वादळी वारे व विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले. वीज पडून प्रत्येकी दोन गायी आणि म्हशींचा मृत्यू झाला. नवे निरपूर शिवारात राहणाऱ्या उत्तम सजन सूर्यवंशी या शेतकऱ्यांच्या गुरांच्या गोठ्यावर वीज पडली.

यात गोठ्यात बांधलेली एक म्हैस आणि एक गाय जागेवरच मृत्यूमुखी पडली. ताहाराबाद रस्त्यालगत असणाऱ्या शेतकरी विजय बाजीराव कापडणीस यांच्या (गट न. २६८) शेतात वीज पडल्याने गीर गाय मृत्यूमुखी पडली. टोकडे येथील शेतकरी विठोबा डिंगर यांच्या म्हशीवर वीज पडल्याने तिचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohammad Shami पुनरागमनाच्या सामन्यातच ठरला मॅचविनर! ७ विकेट्सह फलंदाजीतही पाडली छाप; पाहा Video

Winter Health Tips : हवामानातील बदलामुळे होणाऱ्या सर्दी-खोकल्याला वैतागला आहात, औषधांपेक्षा हे घरगुती उपाय ठरतील फायद्याचे

Healthy Food : मुलांसाठी पोषक आहेत हे लाडू, घरीच बनवा अन् नैसर्गिकरित्या मुलांची उंची वाढवा

Cherry Blossom Festival : चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल पहायला जपान,चीनला कशाला जायचं? भारतात आहेत ही खास ठिकाणं

Latest Maharashtra News Updates live : अभिनेते, आंध्रचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा महायुतीच्या उमेदवारांसाठी सोलापुरात 'रोड शो'; नागरिकांची मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT