esakal
नाशिक

Nashik News : शासकीय कार्यालयांची सुरक्षितता धोक्यात; गस्ती पथकांची नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र व राज्य सरकारच्या आस्थापनांच्या धोकादायक ठिकाणांचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या राम प्रधान समितीच्या शिफारशीनुसार नाशिक महापालिका हद्दीतील केंद्रीय कार्यालयांच्या संरक्षक भिंतीला लागून असलेल्या तसेच परिसरातील वाढत्या अतिक्रमणे काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (Instructions to remove increasing encroachment adjacent to protective wall of central offices within municipal limits nashik news)

महापालिकेच्या अतिक्रमण विभागानेदेखील अशा आस्थापनांच्या सुरक्षेतेसाठी तातडीने कारवाई सुरू केल्याची माहिती अतिक्रमण उपायुक्त करुणा डहाळे यांनी दिली. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्या वेळी राज्य सरकारने राम प्रधान समिती नियुक्त केली होती. या समितीमार्फत सुरक्षित स्थळांचा अभ्यास करून राज्य सरकारला अहवाल सादर केला जातो व राज्य सरकारच्या सुरक्षा यंत्रणेकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना कारवाई करण्याचे निर्देश दिले जातात.

नाशिक महापालिका हद्दीमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या प्रमुख आस्थापना आहेत. यात मध्यवर्ती कारागृह, करन्सी नोट प्रेस, इंडियन सेक्युरिटी प्रेस, गांधीनगर प्रेस, देवळाली आर्टिलरी सेंटर, ओझर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, रेल्वे इंजिन कारखाना, एकलहरे थर्मल पॉवर स्टेशन या प्रमुख आस्थापना आहेत. या आस्थापनांच्या सुरक्षेसंदर्भात पोलिस आयुक्त कार्यालयाला अहवाल प्राप्त झाला.

त्यात संवेदनशील लष्करी ठिकाणांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची बैठक पार पडली. पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव या बैठकीला उपस्थित होते. महापालिकेकडून उपायुक्त करुणा डहाळे उपस्थित होत्या. पोलिस उपायुक्त बच्छाव यांनी केंद्र व राज्य सरकारच्या आस्थापनांच्या परिसरासह संरक्षक भिंतीला लागून झोपडपट्ट्या तसेच विक्रेत्यांचे अतिक्रमण झाल्याची बाब निदर्शनास आणून देत तातडीने अशा प्रकारचे अतिक्रमण पाठविण्याच्या सूचना दिल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्याअनुषंगाने महापालिकेनेदेखील कारवाई सुरू केली आहे. त्याचबरोबर केंद्र व राज्य सरकारच्या आस्थापनांच्या बाहेर अतिक्रमण होऊ नये, यासाठी नियमित गस्ती घालण्याचे आश्वासन अतिक्रमण उपायुक्तांकडून देण्यात आले.

येथे अतिक्रमण

इंडिया सेक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेस या महत्त्वाच्या आस्थापनांच्या परिसरात विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. एकलहरे थर्मल पॉवर स्टेशन, गांधीनगर प्रेस, पोलिस अकादमी तसेच देवळाली आर्टिलरी सेंटरच्या संरक्षक भिंतीला लागून झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण झाले आहे. सदर अतिक्रमण तातडीने हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

"केंद्र व राज्य सरकारच्या कार्यालयांच्या बाजूला असलेले अतिक्रमण तातडीने पाठविण्यात येणार आहे. नवीन अतिक्रमण होऊ नये यासाठी गस्तीपथक नियुक्त केले जाईल." - करुणा डहाळे, अतिक्रमण उपायुक्त, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT